Oplus_16908288

Oplus_16908288


गर्लगुंजी, प्रतिनिधी : सालाबादप्रमाणे गर्लगुंजी गावची ग्रामदैवत श्री माऊलीदेवी यात्रोत्सव तसेच श्री लक्ष्मीदेवी मंदिर आणि श्री मय्याम्मादेवी मंदिर वर्धापन दिन यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यात्रोत्सवानिमित्त गावात पाच वारांची पालखी होणार असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


कार्यक्रमाची सुरुवात: मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी उडगम्मा देवी यात्रेने झाली. त्यानंतर शुक्रवार, २४ एप्रिल रोजी श्री रेणुका यल्लम्मादेवीचा परड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला .


सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी श्री लक्ष्मीदेवी मंदिर व श्री मर्याम्मा मंदिराचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. सकाळी ९ वाजता देवीच्या मुखवट्यांचे देवघरातून वाजतगाजत मंदिरात आगमन होईल. त्यानंतर सुवासिनींच्या हस्ते वेणी मुर्तींना अभिषेक, महाआरती तसेच देवीला ओटी भरणे व नैवेद्य दाखविण्याचा कार्यक्रम होणार आहे.

श्री माऊली देवी यात्रा उत्सव मंगळवारपासून


मंगळवार, २८ एप्रिल रोजी ग्रामदैवत श्री माऊलीदेवी यात्रोत्सवाला प्रारंभ होईल. दुपारी २ वाजता करडी मजल्याच्या निवासस्थानातून देवीची पालखी व मुखवटे मंदिराकडे प्रस्थान करतील. त्यानंतर देवीला गाऱ्हाणे घालून यात्रोत्सवाची सुरुवात होईल.
बुधवार, २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजता गावातून आरतीचे प्रस्थान माऊली मंदिराकडे होईल. त्यानंतर इंगळ्यांना सुरुवात होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवार, १ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आरती होऊन माऊली देवीच्या मुखवट्यांचे पुन्हा गावाकडे प्रस्थान होईल आणि यात्रोत्सवाची सांगता होईल.
यात्रोत्सव समिती, श्री लक्ष्मीदेवी मंदिर व श्री मय्याम्मादेवी मंदिर व्यवस्थापक समिती, पंचमंडळी आणि ग्रामस्थांनी सर्व भाविकांनी उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

उद्याच्या बातमीत वाचा……चापगाव–गर्लगुंजी नात्याचा ऐतिहासिक संदर्भ,
नववधूच्या सतीची ऐतिहासिक आख्यायिका, गर्लगुंजीत इंगळ्या न्हाऊ घालण्याची अनोखी धार्मिक प्रथा.. या मागचे कारण काय..

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us