Oplus_16908288

Oplus_16908288


खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
तालुक्यातील माडीगुंजी येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शंकर विष्णू घाडी यांचे राहते घर जळून खाक झाले आहे. या आगीत संसारोपयोगी साहित्यासह घराचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, घाडी कुटुंब उघड्यावर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच खानापूर तालुक्याचे आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांनी तातडीने माडीगुंजी गावाला भेट दिली. त्यांनी जळालेल्या घराची पाहणी करून घाडी कुटुंबाचे सांत्वन केले. “ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, घाडी कुटुंबाला सरकारी नियमांनुसार जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी त्यांच्यासोबत भाजप युवा नेते श्री. किशोर हेब्बाळकर, भाजप स्थानिक नेते श्री. पंकज कुट्रे, श्री. नेताजी घाडी, श्री. मुरलीधर घाडी यांच्यासह गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते.
अचानक ओढवलेल्या या संकटामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाने या घटनेचा पंचनामा करून पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक आधार द्यावा, अशी मागणी माडीगुंजी ग्रामस्थांनकेली आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us