Oplus_16908288

Oplus_16908288

चापगाव/ प्रतिनिधी : चापगाव पाटील गल्ली येथील जागृत देवता श्री अव्वादेवीचा त्रैवार्षिक उत्सव आज मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे या निमित्ताने मंगळवारी सायंकाळी आठ वाजता पंचमंडळी व देवीच्या पुजारेकदारींच्या उपस्थितीत ओटी भरून प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर गावातील फोन्डेश्वर व दैवतांच्या ओट्या भरणे करून यात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली. या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने रात्री बारानंतर या देवीसमोर नवस फेड कार्यक्रम होणार आहे रात्रभर जागर कार्यक्रम व बुधवारी दिवसभर प्रसादादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अनेक पै- पाहुणे माहेरवाशींनी व गावातील भाविकांनी गर्दी केली होती. या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने चापगावच्या इतिहासावर आधारित “शोध चंपावती नगरीचा” ही पुस्तिका श्री अव्वादेवीच्या चरणी लेखक पिराजी कुऱ्हाडे यांनी सुपूर्ती केली. व येथील पंचमंडळींना पुस्तिका देऊन त्यांचा गौरव केला यावेळी पाटील गल्ली पंच कमिटी व उत्सव कमिटीच्या वतीने पुस्तिका अनेकांनी स्वीकारली.

oplus_6292480

शोध चंपावती नगरीचा पुस्तिकेत अनेक दैवतांचा शोध…

चापगाव गावचे इतिहासावर आधारित या शोध संपावती नगरीचा पुस्तिकेत गावातील सर्व दैवतांचे महत्त्व गावच्या उत्पत्तीचा भाग, गावातील प्रत्येक दैवतांची माहिती, रीती रिवाज आणि परंपरा, प्रत्येक घराण्याची ओळख व व कुलाचार परंपरा, त्याचबरोबर गावच्या विकासाचे शिल्पकार अशा अनेक घटनांचा आढावा या पुस्तकात आहे प्रामुख्याने पाटील घराण्याची देवता श्रीअव्वादेवी देवता कोण ? या देवीचे महत्व काय? पुरातन इतिहासात या देवीला काय महत्त्व आहे अशा अनेक पौराणिक गोष्टींचा कथासार या पुस्तिकेत मांडण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहे. त्यामुळे हे पुस्तक घेण्यासाठी अनेकांची मागणी वाढली आहे.

Oplus_16908288

Do Share
error: Content is protected !!
Call Us