Photo_1773077718347

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :

चापगाव तालुका खानापूर येथील नव्याने जीर्णोद्धारित करण्यात आलेल्या दक्षिण मुखी श्री मारुती मंदिराचा उद्घाटन समारंभ येत्या हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर करण्याचा एकमुखी निर्णय नुकताच झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. येथील दक्षिणमुखी श्री मारुती मंदिर नवसाला पाहणारे देवस्थान म्हणून ओळखले जाते. सदर मंदिर गेल्या अनेक वर्षापासून दगडी अत्यंत लहान होते. पण 2015 मध्ये गावातील सामाजिक कार्यकर्ते व हनुमान भक्त, ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते, माईन ओनर श्री मारुती पुनप्पा चोपडे यांनी स्वखर्चाने मंदिर उभारणी करण्याचा संकल्प ग्रामस्थांना दिला. त्यानुसार या मंदिराचा भूमिपूजन करून मंदिराच्या उभारणीला त्यांनी स्वखर्चाने प्रारंभ केला तब्बल 25 ते 30 लाखापर्यंत त्यांनी पदरमोड करून या मंदिराची सुसज्ज इमारत उभारली आहे. मंदिर उभारण्याचा संपूर्ण संकल्प त्यांनी स्वखर्चाने हाती घेऊन गावच्या विकासात त्यांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याचे नेहमी कौतुक होताना दिसते. या मंदिराचे काम पूर्ण झाले असून येत्या हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर तीन दिवसाचा नयनरम्य उद्घाटन सोहळा व हनुमान जयंती साजरा करण्याचा निर्णय त्या बैठकीत घेण्यात आला. तीन दिवसाच्या या मंदिर उद्घाटन सोहळ्यात दि. 31 मार्च रोजी मंदिराचा वास्तुशांती होम हवन होईल. दि. एक एप्रिल रोजी मंदिरात, कळसा रोहन, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, धार्मिक विधी झाल्यानंतर सकाळी 11 वाजता विविध मठातील स्वामीजींच्या तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिराचा उद्घाटन समारंभ झाल्यानंतर सामूहिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. सायंकाळी सात नंतर हनुमान जयंतीच्या निमित्ताने जागर कार्यक्रम होईल. दि. 2 एप्रिल रोजी हनुमान जयंती शुभमुहूर्तावर मंदिरात जन्मोत्सव होऊन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांच्या वतीने गावच्या वतीने एक दिवसाचा सामूहिक महाप्रसाद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत गावातील अनेक ज्येष्ठ मंडळी, पंचमंडळी, युवा वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

दक्षिणमुखी मारुती मंदिर हे नवसाला पावणारे मंदिर आहे. 1975 मध्ये या मंदिरात जुनी दक्षिणमुखी मारुतीची मूर्ती भग्न झाल्याने 1978 मध्ये स्वर्गीय महादेव जंगाप्पा पाटील यांनी पोरं दोन ला एक घेतला आपल्या पाटीलकीच्या काळात मंदिराची उभारणी करून गावाला वैभव प्राप्त करून दिले होते. सदर मंदिर अति लहान झाल्याने त्याचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प घेण्यात आला व याची संपूर्ण जबाबदारी मारुती पुन्नापा चोपडे यांनी घेतली. आज ते काम त्यांनी पूर्णत्वाला आणून गावच्या विकासात व वैभवात भर पडली आहे.

oplus_2098176

उद्घाटनाचा कार्यक्रम ठरविताना ग्रामस्थ पंचमंडळी व युवा वर्ग

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us