IMG_20251226_161435

खानापूर /प्रतिनिधी: शुक्रवारची सकाळची वेळ, गावात महिला सकाळच्या प्रहरी अंगण साफ करणे, पाणी भरणे अशी क्रिया चालू असताना अचानकपणे एक माकड गावच्या गल्लीतून पळत आले आणि महिलांच्यावर अचानकपणे हल्ला करत धुमाकूळ घातला. त्यामध्ये पाच महिला जखमी झाल्याची घटना चापगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील अल्लेहोळ येथे घडली. घडलेल्या प्रकारामुळे महिलात भीती निर्माण झाली. माकडाला हुसकावण्यात आले. तातडीने ही बाब वनखात्याला कळवण्यात आली, तोवर त्या माकडाने तिथून पोबारा केल्याचे दिसून आले.

याबाबत मिळालेली माहिती की अल्लेहोळ येथे सकाळी नऊच्या सुमारास काही महिला आपल्या अंगणात घरात काम करत होत्या. अचानकपणे एक धीफाड माकड गल्लीतून पळत आले आणि त्यांनी जिथे महिला थांबल्या आहेत, तिथे जाऊन त्यांच्या अंगावर उडी टाकला सुरुवात केली. घाबरून महिला इकडे तिकडे सैरावैरा धावल्या. त्यामध्ये पडून या महिला जखमी झाल्या. यामध्ये मलप्रभा निवृत्ती तोरगल (वय 60) या महिलेच्या डोकीला गंभीर दुखापत झाली असून तिच्या डोक्यात पाच टाके पडले आहेत. तसेच आणखी एक महिला लक्ष्मी विलास तोरगल या महिलेचा हात फॅक्चर झाला आहे. तर आणखी दोन महिला रस्त्यावर पडून जखमी झाल्या. एकूणच त्या माकडाने गाठलेल्या धुमाकूळ मुळे महिलात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तातडीने त्यांना गावातच प्राथमिक उपचार झाल्यानंतर खानापूर येथील शासकीय रुग्णालयात जाऊन अधिक उपचार करण्यात आले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us