Oplus_16909312
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
सीमा प्रश्नाचे सोडवणूक हेच आमचे ध्येय असून शेवटच्या श्वासापर्यंत या लढ्याला आपण ताकद देण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. सीमावाशीयांचा न्यायदेवतेवर विश्वास ठेवून हा आपला प्रश्न नक्कीच सुटेल यात शंका नाही. अशा आशावाद व्यक्त करून लोकशाही तत्त्वानुसार हा लढा सुरू असून तिसऱ्या पिढीनेही या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन म ए समितीचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी व्यक्त केले. आज एक नोव्हेंबर कळ्या दिनी खानापूर येथील शिवस्मारक सकाळी दहा वाजल्यापासून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दुपारी तीन वाजता लाक्षणिक उपोषणाचे सगळेच रूपांतर झाले.
यावेळी बोलताना गोपाळराव देसाई म्हणाले, सीमाप्रश्न सुटावा हा संपर्क सीमा भागातील 25 लाख मराठी भाषेचा मागणी आहे. न्यायालयात सुरुवातीला लढ्यानुसार सरकार महाराष्ट्र सरकार पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे एक दिवस आपल्याला नक्कीच न्याय मिळेल. कर्नाटक सरकारने सीमा भागात दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या केली आहे. आणि सनदशीर मार्गाने मराठी भाषेचा लढा सुरू असताना त्यांची अडवणूक करून त्रास देण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्नातून आपले अंग काढून घेऊ नये कर्नाटक सरकारने चालवलेल्या अन्यायाला केंद्र सरकारने मूक संमती दिली आहे त्यामुळे कर्नाटकचे फावले आहे. त्याकरिता मराठी भाषेकांनी संघटितपणे हा लढा पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली लढा कायम ठेवावा असे आवाहन राष्ट्रीय एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले
यावेळी समिती नेते मारुती परमेकर, गोपाळराव पाटील, पांडुरंग सावंत रणजीत पाटील, हनुमंत जगताप, राजाराम देसाई, गोपाळ हेब्बाळकर, आदींनी यावेळी विचार मांडले. बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, संजीव पाटील,कृष्णा कुंभार, रमेश धबाले, मरू पाटील, मारुती गुरव, वसंत नावलकर, प्रकाश चव्हाण, कृष्णा मनोलकर, अजित पाटील, विठ्ठल गुरव, रुक्मणा झुंजवाडकर, मुकुंद पाटील, नागेश भोसले, शंकरराव पाटील, रामचंद्र गावकर, संतोष पाटील, शामराव पाटील, या सर्व अनेक जण उपस्थित होते.
खानापूर: लक्ष्मीदेवी मंदिरात समितीचे उपोषण!

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर स्टेशन रोड येथे लक्ष्मी मंदिरामध्ये एक नोव्हेंबर काळा दिनानिमित्त सकाळी दहा ते एक पर्यंत लाक्षणिक उपोषणे व दोन वाजता सभा संपन्न झाली,
यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री सूर्याजी सहदेव पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारचा निषेध करून जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात जाण्याचा लढा असाच सुरू राहील असे सांगितले, तालुका पंचायतीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते सुरेशराव देसाई यांनी सुद्धा केंद्र व राज्य सरकारचा निषेध करून लढा तेवत ठेवण्यासाठी प्रत्येक मराठी भाषिकांनी सहकार्य करावे असे आव्हान केले, तसेच युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळकेवर ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन दबाव घालून अन्यायाने केसेस करत आहेत हे चुकीचे असून शुभम शेळके यांच्या पाठीशी आम्ही खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती खंबीरपणे उभे आहोत, शुभम शेळके व धनंजय पाटील यांनी आपले कार्य असेच सुरू ठेवावे असे सांगितले, तसेच कर्नाटक शिवसेनेचे उपप्रमुख श्री के पी पाटील यांनी सुद्धा केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करून सीमा चळवळ येथील कार्यामध्ये शिवसेना खांद्याला खांदा देऊन समिती बरोबर एकत्र लढेल असे बोलताना सांगितले, दयानंद चोपडे यांनी सुद्धा एकनिष्ठ समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित राहून ही सीमा लढ्याची चळवळ अबाधित ठेवावी या चळवळीला ठेच पोचवणाऱ्या संधी साधू नेत्या पासून सावध रहावे, असे आवाहन केले,
खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील बोलताना म्हणाले समितीचे कार्य अखंड ठेवून प्रत्येक गावातील नागरिकांशी संपर्क साधून इथून पुढे समितीची ताकद निर्माण करणे गरजेचे आहे व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून एकत्रपणे कार्य केल्यास समितीला बळकटी येईल तर पी.एच. पाटील यांनी आपले विचार मांडताना महाराष्ट्र सरकारची दाखल केलेल्या दाव्याबद्दल उदासीनता स्पष्ट करताना खंत व्यक्त केली व महाराष्ट्र सरकारने समितीच्या नेत्यांशी संपर्कात राहून ताकदीनिशी लढा लढावा असे सांगितले,
यावेळी बळीराम पाटील, प्रकाश पाटील, मल्लाप्पा पाटील, राजू पाटील, विनायक सावंत, विलास बेडरे, अर्जुन केसरेकर, कल्लाप्पा पाटील, यल्लाप्पा तोरगल, नारायण गुरव, वैराळ सुळकर, तुकाराम कोल्हेकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.