IMG-20251029-WA0045

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :

सीमावासियावर कर्नाटक सरकारने चालविलेल्या अन्यायाने कळस गाठला आहे. गेल्या 68 वर्षांपासून आपण न्याय्य हक्कासाठी लढत आहोत. आपला लढा न्याय मिळेपर्यंत निरंतर सुरु राहील. अन्यायाला आंदोलनाने उत्तर द्यावे लागेल, त्यासाठी मराठी भाषिकांनी काळ्यादिनी आपले व्यवहार बंद ठेऊन सरकारचा निषेध नोंदवावा, असे आवाहन आज नंदगड येथील जागृती फेरीदरम्यान खानापूर म. ए. समितीने केले.

आज बुधवारी (ता. 29) नंदगड बाजारपेठ आणि गावात जनजागृती करण्यात आले. यावेळी समिती नेते आणि कार्यकर्त्यांनी पत्रके वाटून खानापूर येथील एक दिवशीय धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, प्रविण पाटील, मोहन गुरव, ब्रम्हानंद पाटील, रुकमान्ना झुंजवाडकर, राजाराम देसाई, डी. एम. भोसले, विठ्ठल गुरव, ज्ञानेश्वर गुरव आणि ज्ञानेश्वर बिडकर उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us