oplus_1024
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांच्या गोठ्यातील कसरत म्हणावी लागते. अलीकडच्या काळात बैल जोडी पाळणे एक कठीण आव्हान आहे परंतु पूर्वी काळी प्रत्येक घरात एक बलदंड पैलवान त्याचबरोबर एक बैल जोडी ही शेतकऱ्याची शान असायची परंतु अलीकडच्या काळात ती कुठेतरी लोप पावत चालली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या गोट्यातील जनावरे कमी होत चालली आहेत त्यामुळे भारतीय संस्कृतीला अलीकडच्या काळात शेतकऱ्यांचा गोठा व पैलवानगिरी एक आवाहन ठरली आहे. मात्र ती जतन करण्याचे काम आम्ही सर्वांनी केले पाहिजे असे सांगून लैला साखर कारखान्याला येत्या आठवड्याभरानंतर ऊस गाळपाला प्रारंभ होणार असून शेतकऱ्यांना न्यायबद्धरित्या ऊस दर व तोडण्या देण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. तेव्हा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे विचार लैला साखर कारखान्याचे व्यवस्थापक भाजप नेते सदानंद पाटील यांनी व्यक्त केले.

खानापूर तालुक्यातील येडोबा येथे आज गुरुवारपासून बैलगाडा शर्यतीला प्रारंभ करण्यात आला या शर्यतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. येथील लक्ष्मी युवक मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन आज गुरुवार दिनांक 10 ऑक्टोंबर पासून येडोबा माळावर आयोजित करण्यात आले आहे. या शर्यतीमध्ये लहान गट मोठा गट अशा दोन गटांमध्ये शर्यत आयोजित करण्यात आले असून सदर शर्यत शुक्रवार शनिवार दोन दिवस चालणार आहे. या शर्यतीत मोठ्या गटात प्रथम क्रमांकाचे बक्षीस 21001 तर बिनधाती लहान गटात प्रथम क्रमांकाचे बक्षीस 15001 अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक रामचंद्र कांबळे होते.
शर्यतीचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अनुपस्थितीत लैला कारखान्याचे एमडी सदानंद पाटील तसेच लहान गटातील शर्यत गाड्यांचे उद्घाटन हलकर्णी येथील उद्योजक शंकर चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमात शितावडा येथील यशस्वी उद्योजक आकाश गव्हाळकर, उद्योजक प्रकाश सूर्यवंशी, भाजप कार्यकर्ते सदानंद होसुरकर, पी के पी एस चे संचालक शंकर बाळाराम पाटील, निवृत सैनिक संदीप अंधारे, एक्स आर्मीमन पांडुरंग अंधारे, एक्स आर्मीमन गंगाराम निलजकर, माजी तालुका पंचायत सदस्य वासुदेव नांदुरकर ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील, पत्रकार पिराजी कुराडे ग्रामपंचायत सदस्य रमेश हंगिरकर, योगेश ट्रेडर्सचे मालक प्रकाश पाटील शर्यत कमिटीचे अध्यक्ष परसराम सनदी अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
हिंदू धर्मासाठी एक पाऊल युवकांचे: पंडित ओगले.

यावेळी प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना पंडित ओगले आणि यडोगा गावात धर्म जागृती व एकात्मतेचे प्रतीक असल्याने या गावावर आणि त्यांचे प्रेम आहे. येथील प्रत्येक व्यक्ती हिंदू धर्माच्या लढ्यात नेहमी कार्यतत्व राहतो. त्यामुळे या गावाचा अभिमान वाटतो. आजच्या कलियुगात धर्म व संस्कृती टिकवण्यासाठी प्रत्येकाच्या योगदानाची गरज आहे. सत्तेचा राजकारणात धर्माच्या विरोधात राजकर्त्यांची गणिते आहेत ती मोडीत करण्यासाठी गावागावात धर्म टिकवणे गरजेचे असून धर्म जागृतीसाठी प्रत्येकाने कार्यतत्व रहावे व आपले हिंदुराष्ट्र कायम राहावे. यासाठी सर्वांनी धर्माच्या कार्यासाठी कार्यतत्पर रहावे असे विचार या व्यासपीठावरून व्यक्त केले. या शर्यतीत समालोचन प्रा एन एम सनदी, सहशिक्षक तुकाराम सनदी, शिक्षक वाय के खांबले भरत खांबले यांनी केले.