Oplus_16777216
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : जीवनात चांगले कर्म व दानशूरता हा धर्म अत्यंत मौलिक आहे. आपल्या उत्पन्नातील काहीसा खारीचा वाटा धर्मासाठी किंवा गावच्या विकासासाठी खर्च केला तर प्रत्येकाच्या जीवनात समाधान प्राप्त होते. गावची धार्मिक रितीरिवाज व मंदिरांच्या झोपण्यासाठी आतापर्यंत गावातील अनेक देणगी दराने माहेरवाशींनी दिलेल्या देणगीतून मंदिरांना उर्जिता अवस्थेत आले आहे. ग्रामदेवता लक्ष्मीदेवी ही गावची आराध्य मानली जाते या मंदिराचा जिर्णोत्तर करण्याचा संकल्प ग्रामस्थ कमिटीने हाती घेतला आणि गावातील अनेक देणगीदार माहेरवाशींनी स्वखशिने या मंदिराच्या उभारणीसाठी आपला खारीचा वाटा देऊ केला आहे. त्यामुळेच लवकरात लवकर या मंदिराची उभारणी होण्यास वेळ लागणार नाही. अशा दानत्वातून या श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिराचा लवकरच जिर्णोद्धार पूर्ण होईल असे उद्गार श्री महालक्ष्मी देवी जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष रणजीत पाटील यांनी व्यक्त केले.
हलगा तालुका खानापूर श्री महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्वार कमिटी देणगी बुकचा प्रकाशन सोहळा रविवार दि.31 रोजी संपन्न श्री महालक्ष्मी जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष रणजीत कल्लाप्पा पाटील यांच्या अध्यक्ष खाली संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
पाहुण्यांचे स्वागत कार्याध्यक्ष सुनील मारुती पाटील यांनी स्वागत केले दीपप्रज्वलन युवराज पाटील, प्रमोद पाटील गणपती पाटील कुमार फटाण महाबळेश्वर फटाण यांच्या हस्ते करण्यात आले. पावती पुस्तकांचे उद्घाटन माहेरवाशींनी. प्रतिभा पाटील ( जळगे )कल्पना बोकडे( मजगाव ) पूजा भोसले ( नंजिनकोडल ) पूजा पाटील (हलगा) मलप्रभा पाटील(हलगा) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी श्री महालक्ष्मी जीर्णोद्धार कमिटी मेंबर संजय ईश्रान नागेश फटाण रमेश पुंडलिक गुरव पुंडलिक कृष्णाजी पाटील आनंद फटाण गंगाराम पाटील विनोद फटाण आप्पांना मारुती इश्रान संतोष रुपन रवी रुपन महाबळेश्वर पाटील नागेशी गावडू पाटील वसंत सुतार विजय ईश्रांण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला आभार ज्ञानेश्वर सनदी यांनी मानले.
या समारंभात विविध देणगीदारांनी उदारहस्ते योगदान दिले.
आज दिनी असे लाभले देणगीदार….
1) दीड टन लोखंड -श्री पुंडलिक रुद्राप्पा बगडी, (उद्योजक गोवा)
2) एक टन लोखंड व दोन ट्रिप खडी आणि 12001 रु.-श्री प्रकाश दत्तात्रय कडगावकर, (सिव्हिल इंजिनिअर )
3) 50555 रु.-श्री उमजी हणमंत देवकर (उद्योजक पुणे)
4)50 पोती सिमेंट-सौ सपना रुद्राप्पा कल्लन्नवर मु. देवलती (माहेरवासी भगिनी)
5)दोन हजार विटा-श्री संदीप मारुती पाटील (सिव्हिल इंजिनियर)
6) एक ट्रिप खडी -श्री राजू पांडुरंग गुरव ( बिल्डिंग कॉन्टॅक्टर)
7) 50 पोती सिमेंट -श्री रणजीत कल्लाप्पा पाटील, (मंदिर कमिटी अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य)
8)11,111 रु-कु.रोशन शांताराम पाटील(नेव्ही)व रोहिणी शांताराम पाटील(माहेरवाशी भगिनी)
9) 10,555 रु -श्री गजानन अशोक पाटकर (गोवा)
10)5555 रु.-कु. सुरज सतिश रुपण, मु.हलगा
11)5100 रु. सौ. अंकिता नारायण फटाण (माहेरवाशी भगिनी)
12)5001रु.-सौ.शिवानी(नकुशा) शंकर पाटील मु. आसोगा (माहेरवाशी भगिनी)
13)50 पोती सिमेंट- श्री विनोद विठ्ठल फटाण( निवृत्त सैनिक )
14)तीन हजार विटा -श्री नामदेव मारुती खरूजकर (उद्योजक)
15)25 पोती सिमेंट-श्री पांडुरंग ज्योतिबा सुतार, हलगा
16) 101 पोती सिमेंट- श्री अनिल अमृत ईश्राण व श्री ज्ञानेश्वर सुब्राव ईश्राण
व वाढदिवसाचे अवचित साधून फुल नवे फुलाची पाकळी देऊन आज लाखो रुपया पर्यंत देणगी रोख दिलेल्यांचे सुद्धा आभारी आहोत.