IMG_20250816_211455

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : शाळेचा पाया हा प्रत्येक विद्यार्थ्याला घडवण्याचे काम करतो जो विद्यार्थी शाळेत घडतो तोच देशाच्या रक्षणासाठी खरा जवान ठरतो. आपल्याही बाले अवस्थेत आपण अशाच शाळांमधून पुढे जाता जाता देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्याच आनंदातून आज आपण एक सीआरपीएफ जवान म्हणून त्या देशाची सेवा बजावतो याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असे उद्गार नेरसा येथील सीआरपीएफ महिला जवान दीपा देवळी यांनी व्यक्त केले. काल स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खानापूर येथील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी झालेल्या 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व देशाला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमात ध्वजारोहण संस्थेचे चेअरमन अधिवक्ते चेतन मनेरिकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यकर्माचे औचित्य साधून दीपा देवळी यांचा शिक्षण सेवा सोसायटीतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सोसायटी व्यवस्थापन कमिटीचे सेक्रेटरी सुहास कुलकर्णी, संचालक एडवोकेट मदन देशपांडे, समाज सेवक व संचालक जयंत तिनेकर, उद्योजक व संचालक सदानंद कपिलेश्वरी, प्राचार्य पी के चापगांवकर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांचीही भाषणे तथा विद्यार्थिनींनी देशभक्ती गीतावर आधारित नृत्य सादर केले तर शिक्षीकांच्याकडून देशभक्ती गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षक प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य विनोद मराठे यांनी स्वागत केले. दीपक सखदेव आणि ऋषिकेश जोशी यांनी संस्कृत भाषेतील देशभक्ती गीत सादर केले.कशिस धामणेकर हिने सूत्रसंचालन करून आभार मानले. तत्पूर्वी दीपा देवळी यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षण सेवा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यासह राजाराम जोशी गुलाब जैन आदी उपस्थित होते

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us