खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
देशाला महासत्ताक बनवण्यासाठी भारतीय नागरिक हा सक्षम आहे जगाच्या वाटेवर भारत हा समृद्ध व बलवान देश बनवण्यासाठी बलिदान दिलेल्या थोर पुरुषांची आठवण करत देशाला स्वातंत्र्य मिळाले आज या घडीला 79 वर्षे झाली संपूर्ण देश प्रगतीच्या वाटेवर सुरू आहे. विरोधकांना शोक उत्तर देत देश समृद्ध बनवण्यासाठी आज प्रत्येक भारतीय प्रयत्नशील आहे भविष्यात देश हा महासत्ताक देश बनेल यासाठी आजच्या युवा पिढीने देशाचा मान सन्मान व स्वाभिमान वाढवला पाहिजे म्हणूनच या दिनी आपण सर्वांना स्मरून स्वातंत्र्य दिनाचा हा दिवस आम्ही सन्मानाने स्मरण करतो असे प्रतिपादन खानापूर येथील स्वामी समर्थ इंग्रजी स्कूलचे सेक्रेटरी डॉक्टर डीई नावडा यांनी व्यक्त केले शुक्रवारी 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन शाळेच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मॅनेजमेंट कमिटीचे चेअरमन नगरसेवक आप्पया कोडोली, वाजिद कित्तूर यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थापक मंडळ चेअरमन एम एफ पाटील सचिव डॉ खजिनदार पी एन पाटील, संचालक सातेरी पुणूचे,प्रमोद चोपडे उपस्थित होते. मुख्याध्यापक बाळकृष्ण हलगेकर यांनी स्वागत केले. यावेळी शाळेच्या विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी शाळेच्या प्रगती बद्दल तसेच स्वातंत्र्य दिनाबद्दल विचार मंथन केले. सानिया इनामदार यांनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मनीषा कोदाळकर सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.