Oplus_16777216

Oplus_16777216

खानापूर लाईव्ह न्युज / प्रतिनिधी :

पूज्य स्वामीजींच्या गुरुपीठारोहण द्वितप:पूर्ती महोत्सवानिमित्त श्री दत्त पद्मनाभ पीठाद्वारे ॐ दत्त ब्रह्माश्रम – झाडनावगा खानापूर येथे वृक्षारोपण समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पूज्य स्वामीजी संबोधित करीत होते.

पुढे पूज्य स्वामीजी म्हणाले की कर्नाटक प्रांतात छानपैकी कन्नड भाषा ऐकायला मिळाली आणि ती या मायभूमीची ही भाषा आहे. सद्‌गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी सांगत असत की सर्वजण इंग्रजी भाषेवर प्रेम करत आहेत. मग आपल्या मातृभाषेवर का प्रेम करू नये ? त्यामुळे देशातल्या जेवढ्या भाषा असतील, त्या सर्व भाषा आपल्यापणाने त्याचा स्वीकार करणं, आणि ते आम्ही मान्य केलं पाहिजे. मग त्या ज्यांच्या भाषा, ज्यांच्या प्रांतामध्ये असतील, त्या सर्व भाषा वंदनीय आणि पूजनीय आहेत आणि स्वीकारार्ह आहेत. असेही उद्बोधन पूज्य स्वामीजींनी केले.

दरम्यान, वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने पूज्य स्वामीजींचे खानापूर तालुक्यात शुभागमन होताच तेथील शिष्यमंडळी, अनुयायी तसेच ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. या वृक्षारोपणनिम्मिताने दोनशेहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली.पूजनीय स्वामीजींच्या आगमनाने ही भूमी पावन झालेली आहे. असंच पूज्य स्वामीजींची दृष्टी या भूमीवर राहू दे. पूज्य स्वामीजींच्या दिव्य मार्गदर्शनाने या ॐ दत्त ब्रह्माश्रमात गोशाळा प्रकल्प आणि मुलांसाठी शैक्षणिक केंद्र सुरु व्हावं, आपण सर्वजण एकत्रितपणे सनातन संस्कृतीचे हे कार्य करुया. असे प्रतिपादन प्रमोद कोचेरी यांनी केले.याप्रंसगी प्रमोद कोचेरी – उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी – बेळगाव जिल्हा, संजय कुबल – माजी तालुका प्रमुख – भाजपा – खानापूर, पद्मश्री पाटील – चार्टर्ड अकाउंटेंट, रुपेश हुगडे – उद्योजक रामनगर, शामराव पाटील – उद्योजक खानापूर, प्रवीण पाटील – उद्योजक खानापूर, श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालक मंडळ व वन विभागचे अधिकारी उपस्थित होते.

खानापूर : सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या पावन सान्निध्यात वृक्षारोपण समारोहात सहभागी झालेले प्रमोद कोचेरी, संजय कुबल, व अन्य.

Do Share
error: Content is protected !!
Call Us