खानापूर लाईव्ह न्युज / प्रतिनिधी:
तालुक्यातील गुंजी पासून आठ ते नऊ किलोमीटर असलेल्या किरावळे गावाला गेल्या अनेक वर्षापासून बस सुविधा करण्याची मागणी होती. या ठिकाणी बस सुविधा गेल्या स्वातंत्र्य काळापासून कधीही झाली नव्हती. अखेर आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या विशेष प्रयत्नातून अखेर या गावापर्यंत बस सुविधा प्रारंभ करण्यात आला. यामुळे गावातील शाळकरी मुलांसह ग्रामस्थांमध्ये आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या विशेष प्रयत्नाबद्दल अभिनंदन करण्यात आले. येथील मागील 75 वर्षापासून किरावळे गावामध्ये कोणतीही बससेवा चालू नव्हती. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची लोकांची गैरसोय होत होती .ही गैरसोय लक्षात घेता तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी आज किरावळे गावातील विद्यार्थीसाठी, लोकांसाठी आज पासून गावातून बस सेवा सुरू करण्यात आली. या शुभारंभ प्रसंगी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह ग्रामपंचायत अध्यक्ष सौ. स्वाती गुरव, उपाध्यक्ष अमोल बेळगांवकर, सामाजिक कार्यकर्ते पंकज कुट्रे, कृष्णा पाटील व गावातील नागरिक आणि महिला व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
किरावळे हे गाव अलीकडे येथील नवदुर्गा देवीच्या जीर्णोद्वारानंतर खानापूर तालुक्यासह गोव्यामध्ये परिचित असे गाव झाले आहे. येथील नवदुर्गेला गोव्यातील अनेक भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. वर्षातून दोन ते तीन वेळा या ठिकाणी मोठा उत्सव होत असतो. मात्र या ठिकाणी सुविधा नसल्यामुळे गोवा किंवा इतर भागातून येणाऱ्या नवदुर्गा भक्तांना मोठी गैरसोय होत होती. याशिवाय या ठिकाणी असलेल्या पाचवीपर्यंतच्या प्राथमिक शाळेनंतर माध्यमिक शाळा तसेच उच्च शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना गुंजीपर्यंत वाहनान खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. पण आता या ठिकाणी सकाळी व संध्याकाळी बस सुविधा झाल्यामुळे येथील खानापूर जह बेळगाव बघा जाणाऱ्या विद्यार्थिनी तसेच इतर प्रवाशांना याचा चांगलाच लाभ होणार आहे. या गावाला जोडणारा रस्ता पण आता रेल्वे भुयारी रस्ता तसेच पक्का रस्ता झाल्याने येथील आता समस्या दूर झाली आहे.