Oplus_16777216
जीवनात काही ध्येयवेडी माणसे असतात. समाजात ती कधी झळकत नाहीत. मात्र ती आपल्या कर्तृत्व, आणि ध्येय निश्चितीत नेहमी अग्रेसर असतात. आपल्या पारंगत व्यवसायात एक वेगळाच ठसा निर्माण करण्याची ताकद व मनात निर्माण केलेली जिद्द त्यांना यशाच्या पायरीपर्यंत पोहोचवते. पण ह्याच यशाच्या पायरीत गरुड झेप घेता घेता अचानकपणे त्या गरुड झेपित काळोखा अंधार पडला तर, जीवनाच्या गरुड झेपित नियतीने साथ दिली नाही तर, स्वप्न अधुरेच राहते. अशाच पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीतून जीवनात गरुड झेप घेतलेल्या उत्तुंग उच्चारसरणीच्या व्यक्तिमत्वाला अवघ्या वयाच्या 55 वर्षात ती स्वप्ने तेथेच सोडून जाण्याची वेळ आली. तर, पोरके ठरलेल्या त्यांच्या कुटुंबाला येणारे ते अतिव दुःख न सावरणारे ठरते. पण नियतीपुढे कोणाचे चालत नाही हे नक्कीच . अशाच पद्धतीने खानापूर तालुक्याच्या सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या तिवोली गावात लहानाचे मोठे होऊन रोपट्याचा वृक्ष बनण्याचे स्वप्न पाहणाऱ् अथांग व्यक्तिमत्त्व दुरावलं . ते व्यक्तिमत्व म्हणजे निश्चयाचा महामेरू म्हणजे नामांकित LIC प्रतिनिधी स्वर्गीय पांडुरंग शांताराम हेबाळकर होय.

भावपूर्ण श्रद्धांजली
चंदना परी देह झिजविला कष्टातुनी संसार फुलविला! शुन्यातून निर्माण केल विश्व, मणि होता प्रेमळपणा कधि न दाखवला मोठेपणा! वटवृक्ष गेला कोसळून, सावली गेली हरखुनी, नाही उरली साथ आम्हा तुमची आम्हाला पोरख करून गेलात.
दि . 4-7-2025 रोजी कै. श्री. पांडुरंग शांताराम हेब्बाळकर या आपल्या गावातील थोर सुपुत्राचा स्वर्गवास झाला. आज तुमच्या जाण्याला अकरा दिवस झाले. पण आठवणी शिवाय दिवस जात नाही.
असे तुम्ही असामी.. व्यक्तिमत्व .

पांडुरंग शांताराम हेब्बाळकर याचा जन्म दि. 10-03-1970 रोजी निवोली गावातील साधारण कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण गावातच माध्यमिक शिक्षण गुंजी या ठिकाणी वडील प्रगतशिल शेतकरी त्याच बरोबर गावचे पंच व दुधाच्या दुधाचा व्यवसाय करायचे व त्यांचे सतत खानापूरला येणे जाने असायचे. त्याना वाटायचे की, माझी मुल देखील खुप शिकावी. पांडुरंग हेब्बाळकर यांचे पदवी पुर्ण शिक्षण गोगटे कॉलेज बेळगाव येथे झाले. त्यानंतर त्यानी चिर्ल्डन फिल्म सोसायटी द्वारे महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम केले. व ते पुन्हा गावाकडे आले. घरी वडिलांचा दुध व्यवसाय त्यानी चालविला व खेड्यातील गरिब जनतेला संलग्न केले. गुंजी करयादीतील लोक त्याना आज सुध्दा पांडु गवळी म्हणूनच ओळखायचे. दुधाचा व्यवसाय करता करता लोकांचाही संपर्क वाढला त्यातच त्यानी 2003 मध्ये LIC चे प्रतिनिधी बनले . आपल्या स्वभाव गुणांच्या मुळे एक विश्वासु एजंट अशी आपली छाप ठेवली. 2006 पासून ते आजपर्यंत त्यानी शतकवीर प्रतिनिधी म्हणून तर तिन वेळा M.D.R.T प्रतिनिधी म्हणून कार्य केली. संपूर्ण आयुष्यात विमा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना सर्वसामान्य माणसांना नेहमी जोडण्याचे काम केले. त्यांची कामगिरी वाखान्याजोगी आहे. कारण आजच्यायुगात विमा कंपनिमध्ये काम करणे म्हणजे एक दिव्यच आहे. लोकांचा विश्वास संपादन करणे हे त्यांनाच जमले. कारण तुमचा स्वभावच तसा असायचा. समाजात वावरताना इतराशी कसे बोलावे, कसे वागावे यांची शिकवण आम्हाला तुमच्या कडूनच मिळाली. याचीच पोच पावती तुम्हाला समाजाकडून मिळाली. 2007 मध्ये तिवोली गावची ग्राम देवता लक्ष्मी देवी यात्रेचे सेक्रेटरी पदाची जबाबदारी तुम्ही उत्तम रित्या बजावली. समाजात वावरताना जिवणभर कोणाकडूनही वाईट म्हणवून घेतला नाही. आई, वडील, भाऊ पै पाहुने भावंडे यांच्याशी वावरताना स्वताचा आदर्श निर्माण केलात. पण असे जगताना स्वता जगणेने विसरलात. तुमचे घरकुलाचे स्वप्न अध्र्यावर राहीले मुलाना तुम्ही उच्चशिक्षित केलातः पण त्याच्या हातून सेवा करून घेवू शकला नाहीत पण शेवटी काय नियतीचा खेळच म्हणावा लागेल. भाऊ तुम्ही गेल्याचे दुख हे कधीही न विसरणारे आहे. या दुःखद प्रसंगी आमच्या अनेक पै पाहुणे नातेवाईक, राजकीय मंडळी, गावकरी यांनी आम्हा हेब्बाळकर परिवाराला धीर दिला त्याबद्दल त्या सर्वांचे आम्ही प्रतिज्ञाशील राहू.

तुमच्या अकस्मित जाण्याने आम्हा हेब्बाळकर परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला. तो सावरण्याची शक्ती परमेश्वराने देवोत. तुमच्या मनातील उर्वरित इच्छा पूर्ण करायची ताकद तुमच्या धर्मपत्नी, चिरंजीव किशोर, तथा मुलगी, भाऊ व परिवारात निर्माण व्हावी. तुम्ही दिलेल्या आदर्शनीय पावलावर पाऊल ठेवून जगण्याचे सामर्थ आम्हा हेब्बाळकर परिवारावर निर्माण व्हावी हीच मनीच्छा! आपण घालून दिलेल्या शिकवण आम्ही आत्मसात करू, आपल्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! व तुम्हास भावपूर्ण श्रद्धांजली!
महेश. गो. हेब्बाळकर,
शिक्षक -तिवोली