IMG-20250704-WA0078

खानापूर:

तालुक्यातील तीवोली गावचे रहिवासी सुप्रसिद्ध एलआयसी एजंट तथा बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर व खानापूर भाजपाचे युवा नेते किशोर हेबाळकर यांचे वडील श्री पांडुरंग शांताराम हेब्बाळकर (वय 55) यांचे आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई,धर्मपत्नी, एक मुलगा, मुलगी भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यसंस्कार आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता तीवोली येथे होणार आहे.

श्री पांडुरंग हेब्बाळकर हे खानापूर तालुक्यातील एक सुप्रसिद्ध एलआयसी प्रतिनिधी म्हणून उच्चस्त पदापर्यंत पोहोचले होते. एक कर्तव्यानिष्ठ व समाज चळवळीतील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी आपल्या प्रामाणिक सेवेतून अनेक माणसे जोडली होती. काही दिवसापासून ते आजाराने पीडित होते.

Do Share
error: Content is protected !!
Call Us