Oplus_16908288
खानापूर – यलापुर मार्गावरील बिडी नजीक जुंजवाड वळणावर सुसाट वेगाने धारवाडच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीस्वारकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वरात जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सोमवारी सायंकाळी घडली. अपघातात मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव अयुम अकबर नाईक (वय 26 वर्ष) कोट्टूर, तालुका-जील्हा धारवाड असे आहे. सदर अपघात खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला आहे. अपघातात ठार झालेल्या युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील आरोग्य चिकित्सा केंद्रात आणण्यात आला आहे. घटनेची नोंद नंदगड पोलीस स्थानकात झाली आहे. याबाबत नंदगड पोलीस स्थानकाचे पीएसआय एस एस बदामी व हवालदार पांडू तुरमुरी व त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी पुढील तपास करीत आहेत.