
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
माडीगुंजी ता.खानापूर येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये 1997- 1998 साली सातवी पास आणि 2000-2001 साली दहावी पास झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दि. 11 मे रोजी मोठ्या उत्साहाने थाटामाटात संपन्न झाला.तब्बल 24 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.

सर्वप्रथम व्यासपीठावरील उपस्थित सर्व अतिथी शिक्षकांचे स्वागत,त्यानंतर विद्यार्थिनींकडून ईशस्तवन आणि पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेचे फोटो पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ हायस्कूल खानापूर चे विद्यमान प्राचार्य श्री के.व्ही कुलकर्णी सर होते.यावेळी सर्व आजी माजी शिक्षकांचे शाल,श्रीफळ,मानचिन्ह आणि भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षकांच्या हस्ते मानचिन्ह आणि भेट वस्तू देऊन करण्यात आला.यावेळी प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन अमोल बेळगांवकर यांनी केले.
यानंतर विद्यार्थ्यांमधून विनायक घाडी, अमोल बेळगांवकर, गीता गावडे, मीना परेरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच एन डी पाटील सर, डी टी सावंत सर,पी टी मेलगे सर, एम जी घाडी सर, आर के उत्तुरकर सर आणि एम एन तमुचे सर यांची विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी व्यापीठावर एस डी गुरव सर, डी ए पाटील सर, वाय आर पाटील सर,व्ही एन पाटील सर,एन जे गुरव सर,एम एम पाटील सर, ए एम पत्तर सर,एम के काकतकर सर,के वाय चोपडे सर,जे ए रॉड्रिग्ज सर,उषा मंडोलकर,रेखा बांदिवडेकर,आणि अंगणवाडी शिक्षिका सुमन शहापूरकर यांच्यासह सर्व माजी विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी दिवंगत माजी विद्यार्थी, शिक्षक, पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली, आणि भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंधूर यशस्वी केल्याबद्दल विजयोस्तव आणि भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर मराठी शाळेसाठी भेट वस्तू म्हणून भांड्यांचा संच देण्यात आला. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष के व्ही कुलकर्णी सर यांच्या भाषणानंतर अमोल बेळगांवकर यांनी सर्वांचे आभार मानले.आणि दुपारच्या स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.