खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे खानापूर तालुक्यातील वारकरी मंडळी तसेच युवा कीर्तनकार ह भ प विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा येत्या बुधवार दि. 21 मे 2025 ते शनिवार दिनांक 24 मे 2025 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. पंढरपूर येथील भक्तिमार्ग रोड, उंच विठोबा शेजारी, निलजी मठ या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित या ग्रंथराज पारायण सोहळ्याची सुरुवात बुधवार दि. 21 मे रोजी सायंकाळी 7 वाजता ग्रंथ पूजनाने होणार आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोदजी सावंत, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमासाठी खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील, उद्योजक प्रसन्ना घोटगे, उद्योजक विकास पाटील पडलवाडी, बीजेपी युवा नेते दीपक पाटील, उद्योजक नारायण फठाण, उद्योजक शांताराम बडसकर, खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी, उद्योजक कलाप्पा पाटील, कोल्हापूरचे माजी सरपंच राजू गवाळकर, लैला कारखान्याचे एमडी सदानंद पाटील, भाजपचे माजी अध्यक्ष विठ्ठल पाटील ,जांबोटी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष विलास बेळगावकर व संचालक मंडळ, श्रीराम सेनेचे रमाकांत दादा कोंडुसकर, उद्योजक मारुती वाणी, मेरडा ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष महाबळेश्वर पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, संजय कुबल, बाबुराव देसाई, ज्योतिबा रेमाणी अशा अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी खानापूर तालुक्यातील निमंत्रित मान्यवरांनी व वारकऱ्यांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद लुटावा असे आवाहन माझे जिवलग मित्र ग्रुप व वारकरी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
