IMG_20250513_144049

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :

खानापूर येथे मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानद्वारे सुरु करण्यात आलेल्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दि. १५ मे रोजी सकाळी १०.३० वाजता श्री राजा शिवछत्रपती स्मारक येथे उत्साहात संपन्न होणार आहे. मराठी साहित्य, भाषा आणि वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी हे वाचनालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सदर वाचनालय खानापूर येथील मिनी विधान सौध च्या समोर वाझ बिल्डिंग,(गोकुळ हॉटेल पहिल्या मजल्यावर ) जुन्या तरुण भारत कार्यालयाच्या ठिकाणी येथे प्रारंभ करण्यात येणार आहे.
या वाचनालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. श्री. सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. नारायण य. कापोलकर असणार आहेत. मुंबई विद्यापीठातील राजशास्त्र विभागप्रमुख डॉ. दीपक पवार प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला आमदार श्री. विठ्ठल सो. हलगेकर, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, श्री. अरविंद पाटील, डॉ. सौ. अंजलीताई निंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानने आयोजित केलेला हा कार्यक्रम वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. तरी खानापूर आणि परिसरातील सर्व मराठीप्रेमी वाचक, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांना या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केले आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us