IMG-20250509-WA0009

खानापूर : कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा महात्मा फुले शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांच्या हस्ते दि. १० मे रोजी प्रदान करण्यात येणार आहे.

साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे आणि उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर यांनी जाहीर केले आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us