
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यातील मळव- अल्लोळी येथील श्री स्थळ ग्रामदेवता श्री मावसाई देवी यात्रा उत्सव रित्या मंगळवार दि. 13 मे ते गुरुवार दि. 15 मे दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. 11 वर्षांनी या दोन्ही गावची ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय दोन्ही गावच्या पंच कमिटीने हाती घेतला आहे. येथील स्थळदेवता ही जागृत आणि नवसाला पावणारी मानली जाते. यानिमित्ताने दि. 13 मे रोजी सकाळी दहा वाजता ओट्याभरणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर दोन्ही गावातून मिरवणुकीने मावसाई देवस्थानकडे ग्रामस्थ प्रस्थान होऊन त्या ठिकाणी सर्व देवतांच्या मोठ्या भरणी केल्या जाणार आहेत. बुधवार दिं 14 मे 2025 रोजी स्थळ देवीची यात्रा व रात्री स्नेह भोजनाचा कार्यक्रम होईल. गुरुवार दि. 15 मे रोजी दुपारी सीमेचा कार्यक्रम झाल्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे . गुरुवारी रात्री दहा वाजता मळव येथे नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.