
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
मनात देश सेवेची आस, जिद्द चिकाटी यावर आपण भारतीय सैन्य दलात आपल्या कुटुंबाला वाहून घेणार असा प्रणमणी धरून सख्या दोन बहिणीने पराकष्टा करून मिळवलेले मनोबल व देशसेवेची जिद्द ही अभिनंदन ही आहे. खानापूर तालुक्यातील यडोगा येथील या दोन भगिनींनी युवक- युवतीना दिलेली प्रेरणा आहे. याशिवाय तिच्या आई-वडिलांनी यासाठी दिलेले प्रोत्साहन एक आदर्शवत व कौतुकास्पद असल्याचे असल्याचे विचार खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी व्यक्त केले.

खानापूर तालुक्यातील यडोगा येथील सख्या बहिणी माधुरी मल्लाप्पा अंधारे व मयुरी मल्लाप्पा अंधारे यांनी सहा महिन्यापूर्वी भारतीय सेनेत रुजू झाल्यानंतर त्यांच्यावर बराच अभिनंदनचा वर्षाव झाला. या पित्यर्थ अंधारे कुटुंबीयांनी बरगाव क्रॉस येथील हॉलमध्ये कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. यावेळी त्या दोन बहिणींचा सन्मान प्रसंगी ते बोलत होते. खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने त्या दोन बहिणींचा एडवोकेट ईश्वर घाडी यांनी श्रीफळ शाल घालून सन्मान केला,

खानापूर तालुका शिक्षक संघटनेच्या वतीने व्ही बी होसुर, गटशिक्षणाधिकार्यालयातील वरिष्ठ अधिकारी एस एन कम्मार, मुख्याध्यापक चापगावकर, पत्रकार वासुदेव चौगुले, चापगाव हायस्कूलचे कमिटी अध्यक्ष, पत्रकार पिराजी कुराडे, चापगाव मलप्रभा हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. बी. पाटील, तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील, प्राध्यापक एन. एम. सनदी, मनःपूर्वक हायस्कूलचे सहशिक्षक तुकाराम सनदी , मास्केनहट्टीचे गुंडूपकर, दयानंद चोपडे यासह अनेक जण उपस्थित होते.
यावेळी उभयत्यांचे असते त्या दोन भगिनी तसेच मयुरी व माधुरी यांचे वडील मल्लाप्पा अंधारे व आई शांता अंधारे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पत्रकार वासुदेव चौगुले यांनी देशात अनेक मुली भारतीय सेनेमध्ये सेवा बजावत आहेत परंतु एकाच कुटुंबातील दोन भगिनी भारतीय सेनेत रुजू होऊन खानापूर तालुक्याचे नाव उंचावले आहे. यासाठी त्यांच्या आई वडिलांनी दिलेली प्रेरणा ही तालुक्यातील अन्य युवक युतीने घेण्यासारखी आहे असे त्यांनी गौरव उद्गार काढले, पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांनी मयुरी माधुरी ह्या आपल्या दक्षिण महाराज शिक्षण मंडळ संचलित मलप्रभा हायस्कूलची शान ठरले आहेत. आपल्या हायस्कूलमध्ये शिकून त्यांनी देशाच्या सेवेसाठी घेतलेले व्रत शिवाय आपल्या कुटुंबाला यासाठी वाहून घेण्यासाठी केलेला निश्चय हा अभिनंदन असून अशा या युतीला परिसरातील नागरिक नेहमीच गौरवाची थाप देतील असे गौरव उद्गार काढले. यावेळी निवृत्त मुख्याध्यापक व्ही.बी. होसुर, यांनीही विचार मांडले यावेळी अंधारे परिवारातील अनेक पै पाहुणे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमात सूत्रसंचालन व आभार सहशिक्षक तुकाराम सनदी यांनी मांडले.