
खानापूर /प्रतिनिधी : उत्तर कन्नडचे खासदार विश्वेश्वर कागेरे हेगडे यांचा उद्या खानापूर तालुका दौरा होणार आहे. उद्या दिनांक 22 रोजी दुपारी बारा वाजता कुसमळी येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर मंग्यानकोप , गुंडेनहट्टी ,गंदीगवाड ,इटगी या ठिकाणी त्यांच्या गाठीभेटी होतील. सायंकाळी चार वाजता नेरसा येथे त्यांचा दौरा होणार आहे. तरी खानापूर तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका भाजपा अध्यक्ष बसवराज सानिकोप, प्रधान मल्लापा मारीहाळ, गुंडू तोपिनकट्टी यांनी केले आहे.