
खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी तब्बल 27 वर्षा नंतर
सन 1997-98 या शैक्षणिक वर्षातील सरकारी मराठी मुलांची शाळा खैरवाड या शाळेतील माजी विध्यार्थ्यांचा मिळावा लवकरच भरवण्याचा निर्णय शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी घेतला आहे नुकताच या संदर्भात 1997-98 सालातील सातवी विद्यार्थ्यांच्या वर्ग मित्रांची नुकताच विडिओ कॉन्फेरंस झाली व यामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत स्नेह मेळावा घेण्याचा संकल्प हाती घेण्यात आला. खैरवाड गावच्या शाळेची परंपरा इथला विद्यार्थी वर्ग आदर्शवत आहे.याच शाळेतील असंख्य विद्यार्थी उच्च स्थानावर आहेत. पुन्हा एकदा या शाळेची इथल्या गुरु जणांची भेट व्हावी इथल्या मराठी शाळेच्या उणीवा पुन्हा भरून निघाव्यात, माजी विद्यार्थी संघटनेला जीवनसागरातील नदीचा विखुरलेला पण एकमेकांना आधार देणारा प्रवाह समजता येईल. विद्यार्थ्यांना जीवनात अनेक समस्यांना एकाकीपणे तोंड द्यावे लागते. त्यांच्या मदतीसाठी अशी सशक्त व सक्रीय संघटना असली तर त्यांना त्याचा फायदा होईल.हा शुद्ध हेतू समोर ठेऊन हा स्नेहमेळावा भरविण्याचे ठरविण्यात आले.
सन-1997- 1998 या सलातील जे विद्यार्थी-आणि काही शिक्षकांचा संपर्क होऊ शकला नाही त्यांनी कृपया.. या शाळेतील मुख्याध्याकांशी व शाळा व्यवस्थापनासी संपर्क साधून आपण या..स्नेह- मेळाव्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन माजी विद्यार्थ्यांनी केले आहे. या कार्यक्रमास संदर्भात अधिक माहितीसाठी Contact no- 9964494390, 9686226706,9844946054 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.