खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
निसर्गसंपन्न अशा खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात डोंगर पोखरून उंदीर शोधण्याचा प्रयत्न कर्नाटकी सरकारने घातला आहे. उत्तर कर्नाटकाला पिण्याचे पाणी मिळावे हा उद्देश ठेवून ठेवण्यात आलेला कळसा आणि भांडोरा प्रकल्प हा खानापूर तालुक्याच्या पथ्यावर बसणार नाही ना हा चिंतनीय भाग आहे. कळसा प्रकल्पाचे काम घिसाळगाईने झाले आता भांडुरा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्नाटकी सरकारचे छुपे धोरण हे खानापूर तालुक्याच्या पथ्यावर पडणार नाही का?. हा प्रकल्प राबवण्यासाठी जंगलाची मोठ्या प्रमाणात होणारी हानी वेळीच नाही रोखल्यास खानापूरचे वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. यासाठी खानापूरकरांनो वेळीच सावध व्हा असे आवाहन असे कॅप्टन नितीन धोंड व सुजित मुळगुंद यांनी केले आहे. याबाबत विचारमंथन करण्यासाठी तथा खानापूर “वाचवा’ पाऊस वाचवा’ व ‘शेतकरी वाचवा’ या अभियानांतर्गत उद्या बुधवार दि. 09 रोजी सकाळी 10.30 वाजता रावसाहेब वागळे कॉलेजच्या सभागृहात एका चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
खानापूर येथील शेतका-यांना कर्नाटक सरकारनी त्यांची जमीन स्वाधीकरणा बाबत नोटीस पाठवली आहे. भांडुरा नाल्याचे पाऊस मोठ्या पाईपद्वारे धारवाड जिल्यातील गावाना पुरवण्यासाठी जी योजना केलीय त्यासाठी शेतकऱ्यांच्या उपजावू जमिनी ताब्यात घेण्याचा घाट सरकारने घातला आहे. या योजनेमुळे खानापूरच्या शेतकयांच्या जमिनी व पाऊस यांची ताबडतोबीनं हानी होणार आहे. या पाण्यावर अवळंबून असणारे जंगल नष्ट होऊन खानापूरचाच नव्हे तर अख्या उत्तर कर्नाटकातील पाऊस कमी होणार आहे व वाळवंटीकरणाचा वेग वाढणार आहे.
खानापूर चा पाऊस, पाणी, शेती व शेतकरी वाचवण्यासाठी आपण एकजुटीने काय करायचे हे ठरवण्यासाठी कामाला लागायला हवे. त्यासाठी जात, धर्म, भाषा, पक्ष इत्यादी सारे भेद विसरून पुढीक योजना ठरविण्यासाठी बुधवार दिनांक ९ एप्रिल रोजी १०.३० वाजता वागळे कालेज (खानापूर बस स्टॅंड समोर) येथिल सभेसाठी स्त्री-पुरुष नागरिकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री. दिलीप कामत, डॉ. शिवाजी कागणीकर, वकील श्री नागप्पा लातर, जगदीश होसमनी, मल्लिकार्जुन वाली, सिद्धगौडा मोदगी, श्रीमती शारदा गोपाळ ,गीता साहू. काशीनाथ नाईक. शंकरण्णा लंगटी. बसनागौडा पाटील. विल्सन कार्व्हालो आदींनी केले आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी – कॅप्टन नितिन धोंड : 9986901212
कन्नड – सुजित मुळगुंद. : 70261 27479 यांच्याशी संपर्क साधावा अशी आवाहनही करण्यात आले आहे.