
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा आज शुक्रवारपासून प्रारंभ झाली. खानापूर तालुक्यात दहावी परीक्षेसाठी 3647 परीक्षार्थीनी भाग घेतला आहे. मात्र पहिल्या दिवशी झालेल्या मातृभाषेच्या पेपरला तब्बल 37 विद्यार्थी गैरहजर राहिले. खानापूर तालुक्यातून रेगुलर तसेच रिपीटर असे 3883 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी फॉर्म भरले आहेत. त्यापैकी 3647 प्रथम भाषा पेपर साठी पात्र होते. आज शुक्रवारी मातृभाषेतील पहिला पेपर सुरळीत पार पडला खानापूर तालुक्यात 11 परीक्षा केंद्रातून चौख बंदोबस्तात परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ अथवा विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी शिक्षण खात्याने घेतली होती. सकाळी दहा वाजल्यापासून प्रशिक्षेला प्रारंभ झाला. मात्र आज झालेल्या पहिल्या मातृभाषेतील विषयाच्या पेपरला खानापूर तालुक्यातून तब्बल 37 विद्यार्थी गैरहजर राहिल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे आज पहिल्या दिवशी 3610 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.