
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:

19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. या निमित्ताने चापगाव येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवजयंती उत्सव बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी बेकवाड ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष व हडलगा येथील युवा उद्योजक परशराम मडवाळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक व मालार्पण करण्यात आला. तर छत्रपती शिवरायांच्या मूर्ती पूजा तालुका पंचायतीचे उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ, तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष, विजयवाणी चे पत्रकार पिराजी कुऱ्हाडे, चापगाव येथील हाडाचे वैद्य रोशन पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे उपाध्यक्ष संतोष कदम, पप्पू अंबाजी, अर्जुन पाटील, अभी पाटील यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना अभिषेक व अभिवादन करण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीने प्रेरणामंत्र व ध्येय मंत्र म्हणून शिवरायांचा जयघोष करण्यात आला. यावेळी नुकताच रायगड मोहिमेवर गेलेल्या चापगावातील सागर धबाले, अमन कणबर्गी, मनोहर पाटील यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी गावातील अनेक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते, शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.