
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
हलसी येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटी बेळगाव संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर मध्ये 2001- 2002 सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शनिवार दि.15 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी साडेनऊ वाजता हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित या स्नेह मेळाव्याला या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या शाळेने अनेक विद्यार्थी घडवले आहेत अनेक विविध व्यावसायिक क्षेत्रासह नोकरी तसेच सामाजिक क्षेत्रात काम करण्यात असणारे माजी विद्यार्थी एकत्रित येऊन या शाळेच्या आठवणीचा उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे उद्या शनिवारी सकाळी 9.30 वाजता आयोजित या सोहळ्याला सर्व आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक वृंद, व शाळा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.