
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी ; खानापूर तालुक्यातील मणतूर्गा येथील प्रायमरी मराठी शाळेच्या वर्ग खली ची दुरावस्था झाल्याने सदर शाळेच्या दुरुस्तीसाठी अनुदान मंजूर करण्यात यावे अशी मागणी येथील शाळा व्यवस्थापन कमिटी तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी सेक्रेटरी व युवा कार्यकर्ते गजानन पाटील यांनी आमदार विठ्ठल हलवेकर यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन शाळेच्या वर्ग खोली दुरुस्तीसाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी तालुका पंचायत अनुदानातून 3 लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले असून, लवकरच या शाळेच्या दुरुस्ती कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आमदार विठ्ठलराव हलगेकर व हे अनुदान मंजूर करण्यासाठी प्रयत्न केलेले, मणतुर्गा येथील भाजपाचे युवा नेते गजानन (विशाल) पाटील, यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहे.
मणतूर्गा गावातील मराठी प्रायमरी शाळेच्या इमारतीचे संपूर्ण छत मोडकळीला आल्याने येथील शाळकरी मुलांना धोका निर्माण झाला आहे. शाळेची छप्पर निकामी झाल्याने पावसाळ्यात होणारी गळती, डोक्याची घंटा बनली होती. त्यामुळे शाळकरी मुलांना याचा संभाव्य धोका लक्षात घेता गावातील युवा नेते व भाजपाचे पदाधिकारी गजानन (विशाल) गावडू यांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे शाळेच्या वर्ग खोली दुरुस्तीसाठी विनंती अर्ज केला होता. याची दखल आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी घेऊन, सदर शाळेच्या दुरुस्तीसाठी तालुका पंचायतीच्या अनुदानातून 3 लाखांचे अनुदान, मणतूर्गा येथील प्रायमरी मराठी शाळेच्या दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आले आहे. या अनुदानातून शाळेचे छप्पर व गॅल्वनचे लोखंडी पत्रे घालण्यात येणार असून, त्याचबरोबर शाळेतील दरवाजे, व नवीन फरशी बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहेत अशी माहिती युवा कार्यकर्ते गजानन पाटील यांनी खानापूर लाईव्ह शी बोलताना दिली.