
खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी:
ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर यांच्यावतीने प्रति वर्षाप्रमाणे आयोजित दहावी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला आयोजित केली जाते. या व्याख्यानमालेचा सांगता कार्यक्रम येत्या 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी दहा वाजता लोकमान्य भवन खानापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या व्याख्यानमाला कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून जॉईंट रजिस्टर कल्लाप्पा ओबनगोळ, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव विक्रम पाटील, खानापूर वनसंरक्षण अधिकारी सुनीता निम्बर्गी, लैला कारखान्याचे एमडी सदानंद पाटील, उद्योजक मारुती वाणी वागळे कॉलेजच्या प्राचार्य शरयू कदम आधी मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पीटर डिसोजा उपस्थित राहणार आहेत.
यावेळी दहावी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन ठरणारी संभाव्य प्रश्नावली पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यासह मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खानापूर तालुक्यातून ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरणही केले जाणार आहे. यामध्ये श्री विलास बेळगावकर यांना ज्ञानवर्धिनी समाजरत्न पुरस्कार, हंदिग्नुर बहिर्जी शिरोडकर कॉलेजचे प्रा गणपती कांबळे यांना ज्ञानवर्धिनी ज्ञानरत्न पुरस्कार, तर जांबोटी अपंग कल्याण संस्थेचे संस्थापक श्री एस जी शिंदे यांना ज्ञानवर्धिनीचा ज्ञानरत्न जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे ज्ञानवर्धिनीच्या कार्यात कार्य करणारे अनेक शिक्षक समाजसेवक व हितचिंतकांनाही यावेळी गौरविले जाणार असून या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे तरी सर्व शाळांच्या शिक्षक, पालक व दहावीच्या विद्यार्थ्यांनी तसेच मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे सचिव व्ही. बी. होसूर व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.