IMG_20250205_163826

पुणे: मंडळाच्या अंतर्गत सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या इच्छुक महिलांची एक स्वतंत्र कार्यकारिणी स्थापण करून त्याअंतर्गत खास महिलांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. तसेच जसे मंडळातर्फे महिला आणि उद्योजकांसाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून देण्यात येत आहे त्याच धर्तीवर पुणेस्थित सर्व कामगारवर्गाचेही एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून त्यांच्याही अडीअडचणी सोडवण्याचा मंडळ माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मंडळाच्या अंतर्गत महिलांची, उद्योजकांची आणि कामगारवर्गाची एक स्वतंत्र कार्यकारिणी स्थापण करून त्याअंतर्गत नवनवीन उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. असे विचार खानापूर -बेळगाव पुणे मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी व्यक्त केले. गेल्या शनिवारी पुणे येथील दत्त कृष्णाई मंगल कार्यालय धायरी पुणे येथे खानापूर -बेळगाव मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने आयोजित महिलांसाठी आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रारंभी हळदीकुंकू कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदना सादर करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील होते. व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष पिटर डिसोझा, उपाध्यक्ष सुरेश हालगी, कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील, महिला उद्योजिकता आणि सक्षमीकरणाचे मार्गदर्शक सुर्यकांत माडे, बीपीएलचे अध्यक्ष दत्ता भेकणे व माजी अध्यक्ष केदार शिवणगेकर, उद्योजक मारूती वाणी, मंडळाचे जेष्ठ संचालक व जेष्ठ महिला उपस्थित होत्या.

मंडळाच्या माध्यमातून खानापूर, रामनगर, अळणावर, हलियाळ आदी भागांतील पुणेस्थित महिलांना एकत्रित करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याबरोबरच त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. याप्रसंगी श्री माडे यांनी महिलांना बहूमोल असे मार्गदर्शन करताना नवीन छोटेमोठे व्यवसाय सुरू करण्याबरोबरच त्यांना सीएसआरच्या माध्यमातून साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर पिटर डिसोझा, दत्ता भेकणे, लक्ष्मण काकतकर, केदार शिवणगेकर आणि शीतल इंगावले यांनीही आपले विचार मांडले.

या कार्यक्रमामध्ये साधारणपणे ५५० महिलांनी सहभाग नोंदविला तर कल्पना पाटील, रेणुका पाटील, प्राजक्ता देसाई, लक्ष्मी अनगडीकर आदींनी आपली विविध कला सादर केली.

सचिव शिवाजी जळगेकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले तर देमाणी मष्णुचे यांनी आभारप्रदर्शन केले. परशराम निलजकर, श्रद्धा पाटील, प्राजक्ता देसाई आणि मनिषा नांदोडकर यांनी सुत्रसंचलन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व संचालक आणि महिलांनी अथक परिश्रम घेतले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us