
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर शहरातील नामांकित असलेल्या मराठी माध्यमातून मिळालेली चर्च हायर प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन हे त्या शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत, प्रबोधनात्मक विचार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेव्ह. फादर नेल्सन पिंटो प्राचार्य सर्वोदया विद्यालय खानापूर हे राहणार असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्री. विठ्ठल सोमण्णा हलगेकर, श्री. ए.आर. अंबगी प्रभारी क्षेत्र शिक्षणाधिकारी, खानापूर डॉ. माधव प्रभू एमबीबीएस. एमडी कार्डिओलॉजिस्ट केएलई, बेळगाव, श्री. भूषणराव अरुणराव काकतकर उद्योजक बेळगाव, रेव्ह. फादर सेड्रीक फर्नांडीस एस्. जे. सुपीरीयर खानापूर मिशन, श्री. विजय सुरेश होळणकर सेवा सोलर ग्रुप स्वानापूर, श्री. शरद केशकामत समाजसेवक माडीगुंजी, श्री. सदानंद मारुती पाटील एम्.डी. लेला शुगर स्वानापूर, श्री. एन्. श्रीनिवास इंजिनीयर लीऑन इंटरप्रायजेस खानापूर, श्री. प्रशांत शिवाजी गुरव गव्ह. कॉंट्रॅक्टर, अध्यक्ष शाळा सुधारणा कमिटी आदिनाथ निमंत्रित करण्यात आले आहे. तरी सर्व मान्यवर , आजी माजी शिक्षक वर्ग आजी-माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मुख्याध्यापक
श्री. प्रशांत एन्. अळवणी मुख्यायापक शिक्षकवृंद व विद्यार्थीवर्ग मिलाग्रीज चर्च हायर प्रायमरी मराठी स्कूल, खानापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
