
khnaapur : हळदी कुंकू कार्यक्रम हा मकरसंक्रांती पासुन ते रथसप्तमी पर्यंत फार पूर्वीपासून करतात या हळदी कुंकू कार्यक्रमाचे महत्व आमच्या हिंदु संस्कृती मध्ये अन्यन साधारण महत्त्व आहे, त्याच बरोबर मकरसंक्रांतीचे औचीत साधुन आम्ही आमच्या घरी हा हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करत असतो, तरी मंतूर्गे गावच्या ग्रामस्थ, पंच कमिटी व देव रवळनाथ मंदिर बांधकाम कमिटीने हा महिलांसाठी कार्यक्रम आयोजीत करून नारीशक्तीचा मानसन्मान वाढवून तालुक्यात आदर्श निर्माण केलेला आहे.
मौजे मंतूर्गे येथे श्री देव रवळनाथ मंदिराच्या जीर्णद्धाराच्या निमित्ताने मंतूर्गे गावच्या महिलांचा हळदी कुंकू समारंभ सोमवार दिनांक 20/01/2025 रोजी आयोजित करण्यात आला होता, सदरी कार्यकर्माच्या अध्यक्षस्थानी मंतूर्गे गावच्या सौ. सुप्रिया मारुती पाटील होत्या, स्वागतअध्यक्ष सौ. अश्विनी राजाराम गुंडपिकर होत्या, द्वीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले, हळदी कुंकू कार्यक्रम समारंभाचे उद्घाटन निवृत्त मुख्याधीपिका सौ. अरुंधती आबासाहेब दळवी यांच्या हस्ते झाले, गणेश पूजन सौ. साधना बाळाराम शेलार यांच्या हस्ते झाले, श्री देव रवळनाथ पूजन सौ. समृध्दी गजानन गुरव यांच्या हस्ते झाले, विविध देवतांचे पूजन खालील मान्यवरांच्या हस्ते झाले, या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणुन ऍडव्होकेट सौ. अंकिता गौतम सरदेसाई उपस्थित होत्या,
कार्यक्रमाचे अवचित साधून कु.चित्रा बाबाजी गुंडपीकर हिने गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला उपस्थितांचे स्वागत श्री आबासाहेब दळवी गुरुजी यांनी केले, तर प्रास्ताविक श्री बाळासाहेब शेलार यांनी केले, सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री मारुती देवकरी यांनी केले, शेवटी आभारप्रदर्शन शांताराम पाटील यांनी केले,
श्री देव रवळनाथ मंदिर बांधकामासाठी खालील प्रमाणे देणगी देण्यात आली.
सौ.अरुंधती आबासाहेब दळवी 11111,
सौ. शांता शांताराम पाटील 5451,
सौ. साधना बाळाराम शेलार 5031,
सौ. कोमल विश्वनाथ देवकरी 5001,
सौ. सुजाता श्रीपती देवकरी 5001
सौ. रुपाली यलाप्पा मांगीलकर 2121,
सौ. सुप्रिया मारुती पाटील 2100,
कु. चित्रा बाबजी गुंडपीकर 2100,
सौ. लक्ष्मी प्रकाश गुरव 1101-00
सौ. सत्यवा जोतिबा गुरव 1101,
सौ. स्नेहल संजय गुरव 1100,
सौ. उषा पुंडलिक देवलतकर 1019,
सौ. स्नेहल गंगाराम चोर्लेकर 1011,
सौ. भागीरथी बळवंत देसाई 1001,
सौ. अनुराधा अरविंद शेलार 1001,
सौ. स्वाती विजय पाटील 1001,
सौ. निकिता नारायण देवलतकर 1001,
इतर उपस्थित महीला वर्गातून प्रत्येकी 500-00 प्रमाणे देणगी दिली