
khanapur: मौजे अक्राळी ता खानापूर येथे रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सकाळी ठीक दहा वाजता केसरी समर्थ युवा व महिला संघ ग्रा.पं. मोहिशेत व श्री ब्राह्मणी देवी स्पोर्ट्स क्लब अक्राळी यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांमध्ये सौ.उज्वला गावडे बेळगाव, सौ.एलिना बोर्झिस निवृत्त शिक्षिका खानापूर, श्री लक्ष्मण डी पाटील निवृत्त शिक्षक खानापूर , श्री विनोद कुराडे लक्ष इन्स्टिट्यूट पुणे , श्रीगोविंद पाटील माजी सैनिक तोराळी , श्री खेमराज गडकरी युवा कर्ता, अरण्य अधिकारी व पोलीस अधिकारी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हळदी कुंकू हा कार्यक्रम पंचायत हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी सलग सात करत असून महिलांना सबलीकरण ,साक्षरता आणि सक्षम त्याचबरोबर होणाऱ्या अन्याय ,अत्याचार विरुद्ध आवाज उठवणे, एकता निर्माण करणे ,आर्थिक दृष्ट्या सक्षम ,एकंदरीत दारिद्र्य निर्मूलन करणे यासाठी हा धार्मिक कार्यक्रम राबवित आहोत, कार्यक्रम राजकारणापासून अलिप्त असून हा कार्यक्रम आठवे वर्ष आहे. तरी सर्व बंधू भगिनींनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी .ही नम्र विनंती . असे आवाहन संघाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा खांडेकर पत्रकाशी बोलताना सांगितले आहे