खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील एसएसएलसीच्या निवडक विद्यार्थ्यांच्या ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान, खानापुरतर्फे आयोजित केलेल्या प्रतिमावंत विद्यार्थ्यांसाठीच्या व्याख्यानमालेची सुरुवात दि. 19 जानेवारीपासून होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पीटर डिसोजा (पुणे) आणि कार्यकारी अधिकारी निवृत्त मुख्याध्यापक बी. जे. बेळगावकर यांनी दिली
दुसऱ्या सत्रातील ही व्याख्यानमाला 19 जानेवारी, 2 आणि 9 फेब्रुवारीला होणार आहे. या व्याख्यानमालेंतर्गत एसएसएलसीच्या विद्यार्थ्यांना सहा विषयांचे तज्या शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानमालेतर्गत यापूर्वी झालेल्या हलशी, जांबोटी, इदलहोड, नंदगड आणि चापगाव सेंटरचे पहिल्या सत्रातील निवडक शेकडो विद्यार्थी हजर राहणार आहेत. व्याख्यानमालेचे आयोजन खानापूर, बेळगाव रस्त्यावरील लोकमान्य भवनाच्या सभागृहात करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील केवळ मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आहे 19 जानेवारी रोजी विज्ञान समाज विज्ञान विषयाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 2 फेब्रुवारी कन्नड, इंग्रजी आणि मराठी विषय तर 9 फेब्रुवारी रोजी गणित विषयाचे मार्गदर्शन करण्यात आहे.
व्याख्यानमालेची सागता 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सांगता समारंभाचे औचित्य साधून 2023-24 मधील एसएसएलसी परीक्षेत व्याख्यानमालेच्या सेंटरमधील जांबोदी, हलशी, नंदगड (मराठी आणि कन्नड माध्यम) इदलहोड, चापगाव, देवलती, गंदीगवाड, किणये, येकदूर बेनकनहळ्ळी, दड्डी पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचा रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या शिवाय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला ज्ञानवर्धिनी समाजरत्न पुरस्कार, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला ज्ञानवर्धिनी ज्ञानरत्न पुरस्कार आणि 75 वर्षांहून अधिक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात योगदान केलेल्या व्यक्तीला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी निवृत्त मुख्याध्यापक व्ही. बी. होसूर, एन एम देसाई, मुख्याध्यापक एस. पी. धबाले, महेश सडेकर, उद्योजक शिवाजी जळगेकर, निवृत प्राचार्य पी. के चापगावकर संचालक प्रमोद अळवणी, मनोहर होनगेकर आदी प्रयत्नशील आहेत, अशी माहिती पुढे डिसोझा आणि बेळगावकर यांनी दिली.