IMG-20250112-WA0023

खानापूर: तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाची माननीय आमदार श्री रोहित पाटील यांना सदिच्छा भेट जीवन शुभेच्छा दिल्या. व एक निवेदन सादर करून सीमा प्रश्नसंदर्भात लक्ष वेदिले.

रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी बेळगांव येथे आयोजित युवा आघाडी मेळाव्यामध्ये खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळांने महाराष्ट्राचे दिवंगत नेते कै. आर. आर. पाटील यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे सर्वात तरुण आमदार श्री रोहित पाटील यांची भेट घेतली. यावेळी सीमाप्रश्नी सविस्तर चर्चा करण्यात आली, नामदार कै. आर. आर. पाटील यांनी सीमाप्रश्नी विशेष योगदान दिले होते, बेळगांव येथे २००६ मध्ये झालेल्या मेळाव्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आपणही त्याच जोमाने सीमा वासियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी त्यांनी ग्वाही दिली. याप्रसंगी खानापूर तालुक्याचे माजी आमदार श्री दिगंबरराव पाटील, सरचिटणीस श्री आबासाहेब दळवी, मध्यवर्ती म ए समितीचे सदस्य श्री गोपाळराव पाटील, श्री यशवंतराव पाटील, श्री सागर पाटील, श्री संतोष पाटील, श्री विजय पाटील (गर्लगुंजी) व अन्य समितीनेते उपस्थित होते.

Do Share
error: Content is protected !!
Call Us