खानापूर : लोंढा (ता. खानापूर) येथील 33 केव्ही विद्युत केंद्रात दुरुस्ती कार्य राबविण्यात येणार असल्याने शनिवार दि. 11 रोजी लोंढा, नागरगाळी, वरकड, वरकड पाट्ये, मोहिशेत, सातनाळी, माचाळी, घारली, पिंपळे, मुंडवाड, चिंचेवाडी, कोडगई, सुवातवाडी, तारवाड, कुंभार्डा, बामनकोप, कृष्णनगर, नागरगाळी, नागरगाळी रेल्वे स्थानक, वाटरे, जोमतळे, कामतगा, शिंपेवाडी, भटवाडा, जटगे, गुंजी, गुंजी रेल्वे स्थानक, संगरगाळी, भालके बिके, भालके के एच, नायकोल, माणिकवाडी, ढोकेगाळी, तिवोली वाडा, सावरगाळी, शिंदोळी, गंगवाळी, हारुरी, शेडेगाळी, होनकल या भागातील वीज पुरवठा दिवसभर खंडित राहणार आहे. नागरिक व व्यवसायिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन हेस्काॅमचे सहाय्यक कार्यकारी अभियंते जगदीश मोहिते यांनी केले आहे.