खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी:
कर्नाटकातील 41 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या कर्नाटक राज सरकारने केले आहेत. त्यामध्ये खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून लालसाब गवंडी यांची नियुक्ती झाली आहे. श्री लालसाब हैदरसाब गवंडी यापूर्वी सी आय डी विभागात कार्यरत होते. त्यांची आता खानापूर पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
मागील आठवड्यात माजी मंत्री सि.टी रवी यांच्या बेळगाव झालेल्या प्रकरणानंतर खानापूर पोलीस ठाण्यात बराच र*** झाला मात्र या मध्ये नाहक पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली त्यामुळे खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पद रिक्त होते. या ठिकाणी आता नवीन पोलीस निरीक्षक म्हणून गवंडी यांची नियुक्ती झाली आहे.