खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
सदृढ आरोग्य व सुखी जीवनाचा मूलमंत्र म्हणजे खेळ तसेच व्यायाम महत्त्वाचा आहे. बाल वयात सदृढ शरीर तसेच शरीराच्या वाढीसाठी खेळ महत्त्वाचे ठरतात. शिवाय प्रत्येक व्यक्तीच्या उत्तर वयातही व्यायाम महत्त्वाचा ठरतो यासाठी निरंतर व्यायामाची कास धरून सदृढ आरोग्य ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी शालेय जीवनापासून आपल्या उत्तम आरोग्यासाठी खेळांना महत्त्व द्या. खेळामुळे व्यायाम होतो. शरीर सदृढ बनते. त्यामुळे अभ्यास ही चांगला होतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने खेळात भाग घेऊन यश संपादन केले पाहिजे असे मत व्यक्त केले.असे विचार समर्थ स्कूलचे सचिव डॉक्टर डी इ नाडगौडा यांनी व्यक्त केले. शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सन २०२४-२५ सालाच्या वार्षिक क्रिडास्पर्धा गुरुवारी दि.२६ रोजी पार पडल्या. यावेळी ते उद्घाटक या नात्याने बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुनिल पाटील, डॉ. राम पाटील, अध्यक्ष फकिरा एम पाटील, डॉ. एन एल कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. यावेळी उपस्थित पाहूण्याच्याहस्ते विविध फोटोचे पुजन करण्यात आले.यावेळी खेळाडुनी कवायतीचे दर्शन घडविले. पाहुण्यांच्या हस्ते क्रीडाज्योत पेटविण्यात आली. यावेळी खेळांडू यशवर्धन ज्ञानेश्वर नाडगौडा याने गोळाफेक टाकून क्रिडास्पर्धाचे उदघाटन केले. उपस्थित पाहुण्यानी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनिषा कोदाळकर यानी केले. त आभार प्रदर्शन भाग्यश्री पाटील यानी मानले. क्रीडा पाडण्यासाठी प्राचार्या सौ दिव्या डी नाडगौडा व क्रिऽ. व इतर शिक्षकानी परिश्रम घेतले.