खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर पोलीस ठाण्याचे मंडळ पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्यावर निलंबनाची वेळ आली आहे. अधिवेशन च्या शेवटच्या दिवशी बेळगाव येथे झालेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावरील अपशब्द वरून रणांगण झाले. यातील आरोपी माजी मंत्री सि. टी रवी यांना खानापूर पोलीस ठाण्यात आणले असता या ठिकाणी त्यांची व्हीआयपी व्यवस्था केल्याचा आरोप ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस ठाण्यात याच व्हीआयपी फोटोचा पोलीस निरीक्षकांना बसला फटका…
पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना केलेल्या निलंबन शिफारशी सदर्भात दिलेले आदेशात म्हटले आहे कीश्री, बेळगावी जिल्हा दि.19/12/2024 बेळगाव शहर हिरेबागेवाडी पोलीस स्टेशन येथून गुन्हा क्रमांक : 186/202 कलम 76, 79 BNS अधिनियम 2023 अन्वये आरोपी श्री सी. टी. रवी विधान परिषद सदस्य याना सुरक्षेच्या कारणास्तव खानापुर पोलिस ठाण्यात नेले असता त्या ठिकाणी कोणत्याही व्हीआयपी लोकांना प्रवेश देऊ नये असे सुचित केले होते मात्र पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी व्हीआयपी ना रोखण्यात अपयश मिळविले व सुरक्षेच्या बाबतीत योग्य जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एक जबाबदार पीआय दर्जाचा अधिकारी म्हणून तुम्ही अनेक राजकीय नेत्यांना खानापूर पोलीस ठाण्यात घुसून गोंधळाचे वातावरण निर्माण करण्यापासून रोखण्यातच अपयशी ठरला नाही तर वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करून कर्तव्यात अनास्था दाखवली. सदर अहवालात कर्तव्यात कसूर व बेजबाबदारपणा दाखविल्याबद्दल विभागीय चौकशी करण्याचे अधिकार राखून ठेवत तुम्हाला तत्काळ सेवेतून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.