खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास नंदगडहून खानापूरच्या दिशेने येणारा एक लाकडे वाहू ट्रक झाडाला आढळल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रक चालक बालाबाल बचावला आहे. सदर अपघात करंबळ कौदल दरम्यान घडला आहे.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुरगोडून खानापूरच्या दिशेने एक लाकडं वाहून ट्रक येत असताना अचानकपणे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्या बाजूला असलेल्या झाडाला आदळला. यामध्ये ट्रकचा समोरील भाग पूर्णतः निकामी झाला आहे. अपघात होताच ट्रक मध्ये एकटा चालक होता. त्याला किरकोळ दुखापत झाले असून त्याला उपचारासाठी खानापूरतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.