खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
माचीगड- अनगडी श्री सुब्रमण्यम साहित्य अकादमी यांच्या वतीने 28 वे मराठी साहित्य संमेलन येत्या रविवार दि. 29 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष पदी कोल्हापूर येथील जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉक्टर बी एस हिरडेकर राहणार आहेत.
सदर साहित्य संमेलन चार सत्रात आयोजित करण्यात आले असून पहिल्या सत्रात ग्रंथदिंडीचे उद्घाटन, साहित्य नगरीचे उद्घाटन मान्यवरांचा सन्मान प्रकाशन सोहळा, संमेलनाध्यक्षांचे भाषण कार्यक्रम होणार आहेत. दुसऱ्या सत्रात कवितेच्या जाऊ गावा प्राध्यापक गोविंद पाटील जेष्ठ कवी पुणे व प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोतदार सांगली, हलकर्णी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुपारच्या तिसऱ्या सत्रात ज्ञानेश्वरीतील भक्तीयोग या विषयावर व्याख्याते राजा माळगी वाळवा जिल्हा सांगली यांचे व्याख्यान होणार आहे . चौथे सत्र मनोरंजनात्मक राहणार असून श्री हेमंत पाटील जेष्ठ कथाकार ठाणे यांचे कथाकथन होणार आहे. या संमेलनासाठी आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर, माजी आमदार अरविंद पाटील ,निरंजन सरदेसाई यासह अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पीटर डिसोजा राहणार आहेत तरी या संमेलनाचा मराठी साहित्यिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लाभ घ्यावा असे आवाहन अकादमीचे अध्यक्ष बाबुराव पाटील यांनी केले आहे.