खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागात 1993 मध्ये सुरुवात करण्यात आली. जांबोटी मल्टी. सोसायटीच्या 2025 सालातील वार्षिक दिनदर्शिका प्रकाशन सोहळा शुक्रवारी खानापुरात करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास बेलगावकर होते.
प्रारंभिक उपस्थितांचे स्वागत संस्थेचे सचिव संचालक भैरू पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक विलास बेळगावकर म्हणाले, जांबोटी सारख्या दुर्गम भागात अति कठीण परिस्थितीत संस्थेला सुरुवात करताना तळागाळातील लोकांना घेऊन संस्थेची सुरुवात करण्यात आली. येत्या एक जानेवारी 2025 रोजी संस्था 33 व्या वर्षात पदार्पण करत आहे . गेल्या अनेक वर्षात संस्थेच्या वतीने अनेक शैक्षणिक कार्यक्रम, यासह धार्मिक कार्यक्रमात सहभाग दर्शवला आहे.
माजी जिल्हा पंचायत सदस्य नारायण कारवेकर, तालुका काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष ईश्वर घाडी ,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश देशपांडे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरक्षा कुऱ्हाडे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पुढारीचे पत्रकार वासुदेव चौगुले ,तरुण भारत प्रतिनिधी विवेक गिरी यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल विचार मांडला. यावेळी संस्थेची संचालक अण्णासाहेब कुडतूरकर, विद्यानंद बनोशी, पांडुरंग नाईक, शाहू गुरव ,यशवंत नाईक, हनुमंत काजूनेकर , खाचाप्पा काजुनेकर, पुंडलिक गुरव, बी एस कुर्लेकर, भरमानी नाईक, संचालिका सौ जी वि इंगळे, सरस्वती पाटील यासह संस्थेचे व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.
कायदा सल्लागार ॲड केशव कल्लेकर, यांचा 55 वा वाढदिवस साजरा:
या कार्यक्रमाच्या निमित्ताने खानापूर तालुक्यातील एक सुप्रसिद्ध वकील तसेच जांबोटी पतसंस्थेचे कायदा सल्लागार केशव कळलकर यांचा ५५ वा वाढदिवस यावेळी केक कापून साजरा करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.