खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यात वारंवार दौरा करत असलेल्या त्या हत्ती ने पुन्हा एकदा जळगा परिसरात आज बुधवारी दर्शन दिले. गेल्या दोन-तीन महिन्यापासून खानापूर तालुक्याच्या मध्यवर्ती पट्ट्यात सदर हत्ती बिनधास्तपणे भटकत असल्याचे चित्र दिसून आले आहे. तसे या हत्ती पासून कोणते मोठे नुकसान नसले तरी भर वस्तीच्या ठिकाणी हा हत्ती वावरत असल्याने नागरिकात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दोन महिन्या पूर्वी चापगाव भागात ठाण मांडलेला हत्ती जळगाव मार्गे पुन्हा जंगलाच्या दिशेने गेला होता.पुन्हा पंधरा दिवसानंतर सदर हत्तीने रुद्रस्वामी मठाजवळून कोडचवाड भागात उतरला होता. तिथून दुसऱ्यांदा चापगाव मार्गे सदर हत्तीने आपला मोर्चा जळगा कडे वळवला. गेल्या आठ-दहा दिवसापासून सदर हत्ती नदीकाठच्या परिसरात उसाच्या फडात ठाण मानून होता. तो हत्ती पुन्हा जळगा परिसरात वावरात असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी दुपारी जळगा गावाजवळील तलावाजवळ सदर हत्ती असल्याचे निदर्शनाला आले. या ठिकाणी संजय गणपतराव पाटील यांच्या शेतवाडीत भात मळणी सुरू असताना सदर अति निदर्शनाला आला. या ठिकाणी मित्रांसमवेत गेलेले अभिशेक शहापूरकर , प्रमोद पाटील, रजीत पाटील, पिंटू गुरव आदींच्या निदर्शनाला तो आला. पाणथळ जमिनीतील शिवारात अद्याप मळण्या पूर्ण झाल्या नाहीत भात कापण्या करून गंज्या उभारल्या आहेत. पण सदर हत्ती अशा भात गंज्यांचे मोठ्या नुकसान करील की काय अशी भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. यासाठी वन खाते क्रम घेईल काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.