खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यातील मान येथील शेतकरी सखाराम महादेव गावकर यांना अखेर कर्नाटक राज्य वन खात्याने न्याय दिला आहे. सदर शेतकरी सखाराम महादेव कंट्री गावकर यांच्या उपचारासाठी वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी आज दहा लाखाचा धनादेश देऊन आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातून तसेच मान वाशीयातून सरकारचे अभिनंदन होत आहे.
अधिक माहिती की, मान येथील शेतकरी सखाराम महादेव गावकर यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याने त्यांचा पाय निकामी झाला आहे. आठ दिवसांपूर्वी पती-पत्नी शेताकडे गेले असता एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी पत्नी झाडावर चढून बाला बालाबाल वाचली. पण तिच्या वयस्कर पतीला अस्वलाने जबर दुखापत केल्याने त्याला पाय गमवावा लागला. दरम्यान उपचारासाठी वन खात्याने केवळ 40000 हजाराची तात्पुरती मदत करून दिलासा दिला होता. पण इतक्या मदतीने त्या शेतकऱ्यांचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित करून माजी आमदार व एआयसीची च्या सचिव डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी वन खात्याकडे शिफारस करून त्या शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची विनंती केली होती.
दरम्यान काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी त्या शेतकऱ्यांची दवाखान्यात भेट घेऊन मदतीचा धीर दिला होता. काँग्रेस माजी अध्यक्ष व केपीसीसी महादेव कोळी यांनी त्या शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता. या प्रकरणाची वनखात्याने गांभीर्याने दखल घेऊन तालुका वनसंरक्षण अधिकारी सुनीता निम्बर्गी यांनी वनखात्याकडे त्या शेतकऱ्याला आर्थिक मदत तिची शिफारस केली होती.
या शिफारशीची दखल घेऊन वनमंत्री ईश्वर खंड्रे यानी बुधवारी सदर सखाराम गावकर यांच्या कुटुंबीयांना दहा लाखाचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी केपीसीसी सदस्य महादेव कोळी, ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष महांतेश राऊत, काँग्रेस नेते सुरेश जाधव, जांबोटी भागातील कार्यकर्ते दिपक कवठनकर तसेच वनअधिकारी उपस्थित होते.