चापगाव:
चापगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात डांबरीकरण करण्यात आल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. पीडब्ल्यूडी खाते अंतर्गत येणाऱ्या यडोगा तसेच कोडचवाड जोड रस्त्यावर 300 मीटर, तर लालवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर 100 फुट डांबरीकरण हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे चापगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुशोभीकरण झाल्याने छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची ही शोभा वाढली आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून या परिसरात खड्ड्यांचे साम्राज पसरले होते यामुळे चापगाव शिवसुमारक चौक म्हणजे दलदलीचे ठिकाण झाले होते. या कमी आमदार विठ्ठल आगेकर तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे विशेष विनंती केल्यानंतर या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवाय वड्डेबैल पर्यंत जाणाऱ्या रस्त्यात ठिकठिकाणी डांबरीकरण पूर्ण झाले आहे. शिवाय हडलगा रस्त्याची काम ही आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नातून मार्गी लागले आहे.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या चौफेर डांबरीकरण करून घेण्यासाठी पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांनी उभे राहून काम करून घेतले. या कामी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सार्वजनिक बांधकाम खाते अंतर्गत चापगाव छत्रपती शिवाजी महाराज चौकात हाती घेतलेल्या या कामाबद्दल त्यांचेही गावकऱ्यातून अभिनंदन होत आहे शिवाय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी विशेष काळजी घेतल्याबद्दल ग्रामस्थातून समाधान व्यक्त केले जात आहे.