IMG_20240815_092820

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

जगाच्या पाठीवर देश उन्नती पदावर जात आहे. देशाला विकसित देश म्हणून ओळखला जाणारा देश 2047 मध्ये शतक पूर्ण करणारा ठरणार आहे. अशा या समृद्ध देशाचे नागरिक म्हणून आजचे विद्यार्थी भविष्यातील सुजाण नागरिक बनतील. यासाठी प्रत्येकाने देशा प्रति प्रेम, अस्था व निष्ठा राखली पाहिजे. असे विचार तालुका पंचायत चे माजी उपसभापती सयाजी पाटील यांनी व्यक्त केले. 78 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने चापगाव येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मलप्रभा हायस्कूल मध्ये आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात ते अतिथी म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे होते.

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक पी. बी. पाटील यांनी केले झालेल्या कार्यक्रमात ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांच्या हस्ते झाले.ध्वज पूजन ग्रामपंचायत माजी अध्यक्ष व शाळा कमिटीचे उपाध्यक्ष रमेश धबाले, माजी सभापती सयाजी पाटील यांच्या हस्ते झाले. फोटो पूजन पांडुरंग पाटील परसराम पाटील तसेच सुभाष तोरगल यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांची भाषणे झाली. यावेळी बोलताना शाळा व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्ष रमेश धबाले यांनीही आधुनिक शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींनी सुजाण नागरिक बनण्यासाठी प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रात भाग घ्यावा.

देशाचा गौरव आणि विचारांची देवाण-घेवाण मांडण्याचे व्यासपीठ:

भारतीय प्रजासत्ताक दिन असोत किंवा स्वातंत्र्य दिन यासह राष्ट्रीय सण हे देशाच्या प्रगतीचे तसेच देशाचा गौरव वाढवणारे असतात अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी अशा राष्ट्रीय सणांमध्ये व्यासपीठावरून देशाचा गौरव वाढवून समृद्ध देश बनवण्यासाठी चालना मिळते. देशाच्या तख्तावर चालणारा कारभार, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची समृद्धी व होणारा विकास, स्वातंत्र्य भारतासाठी बलिदान दिलेल्या युद्धांची तथा थोर नेत्यांची स्मृति करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठीच व्यासपीठावरून प्रबोधनात्मक विचार मांडण्यासाठी हे सण प्रेरणादायी ठरतात असे विचार शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे यांनी व्यक्त केले.सहशिक्षक नंद्याळकर यांनी सूत्रसंचालन तर आभार श्रीमती काकतकर यांनी केले.

चापगाव ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहण

चापगाव ग्रामपंचायतीच वतीने 78 भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष गंगवा कुरबर यांच्या हस्ते झाले. ग्रामपंचायत उपाध्यक्ष मालुबाई पाटील यांनी पूजन केले. ध्वज पूजन ग्राप सदस मारुती चोपडे, नागराज येळूरकर, नजीर सनदी, सूर्याची पाटील, हनुमंत मादार आदींच्या हस्ते झाले. महात्मा गांधी कथा डॉक्टर आंबेडकर पूजन ग्रामपंचायत सदस्य स्नेहल पाटील, देम्मवा मादार यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामपंचायत सेक्रेटरी रामांना कोलकार, ग्रंथपाल पिराजी कुऱ्हाडे, ग्रामपंचायत क्लार्क गजानन बेळगावकर, नारायण पाटील, राजू पाटील ,विलास पाटील,अण्णाप्पा हारोकोप, अभी पाटील, हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग शाळा कमिटी सदस्य ्य पालक उपस्थित होते.

कन्नड प्राथमिक शाळा व मराठी प्राथमिक शाळेत ध्वजारोहण

येथील कन्नड हायर प्राथमिक शाळा व मराठी प्राथमिक शाळेमध्ये भारतीय स्वातंत्र दीन साजरा करण्यात आला. प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढली त्यानंतर शाळेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात शाळेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष मष्णू चोपडे, कन्नड शाळा कमिटीचे अध्यक्ष विजय मादार आदींचे हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग शाळा कमिटीचे सदस्य व पालक बहु संख्येने उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us