खानापूर :
करंबळ (ता. खानापूर) येथील भक्ती मोहन पाटील (13) या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने घरात कोणी नसताना छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. तिचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले होते.
सदर विद्यार्थिनी मन्सापुर सेंट जोसेफ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. ती एक प्रामाणिक व हूषार विद्यार्थी म्हणून परिचित होती.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून शारीरिक आजार होता.त्यामुळे ती कायम त्रस असायची. गुरुवारी सायंकाळी घरातील मंडळी कामानिमित्त बाहेर दिली असल्याचे पाहून तिने घरात आत्महत्या केल्याचे निदर्शनाला आले आहे. सदर घटनेची खानापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून रात्री उशिरा सदर बालिकेवर शल्यचिकीच्या करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी सकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर बालिकेच्या या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत आहे.