Oplus_16777216

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
तोपिनकट्टी सारख्या ग्रामीण भागात दोन रुपयाच्या फंडातून सुरू झालेल्या श्री महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीने आज 500 कोटीच्या गुंतवणुकीपर्यंत मजल मारली आहे. खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागात उदयाला आलेल्या एका सहकारी संस्थेची उत्तुंग भरारी म्हणावी लागेल. संस्थेच्या प्रगतीत प्रारंभियांपासून आतापर्यंत अनेकानी तन-मन धनाने या संस्थेच्या प्रगतीसाठी झटले आहे. त्या सर्वांचे श्रेय या कामी लागते. म्हणूनच आज खानापूर तालुक्याच्या प्रथम नागरिक प्रतिनिधित्व बरोबर संस्थेची गरुडझेप ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज 27 जुलै 2025 रोजी या संस्थेचा 31 वा वर्धापन दिन साजरा करताना त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. असे उद्गार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले. रविवारी महालक्ष्मी ग्रुपच्या श्री महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीचा 31 वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खानापूर येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी श्री महालक्ष्मी मूर्तीचे पूजन संस्थापक व आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते तसेच सर्व संचालक व वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
महालक्ष्मी शुगर बॉण्ड दाम दुप्पट ठेवीत 35 कोटी !

महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीने नेहमी सभासदांचे हित जपण्याचे कार्य केले आहे. ठेवीदारांच्या विविध स्वरूपाच्या ठेवी वेळेत देऊन विश्वास राखला आहे. आतापर्यंत या संस्थेमार्फत अनेक ठेवीच्या योजना राबविण्यात आला. त्यामध्ये ग्राहकानी मोठा प्रतिसाद दिला आहे. यावर्षी 2025 मध्ये महालक्ष्मी मल्टीप्रकाश सोसायटीने शुगर बॉण्ड दाम दुप्पट योजना अमलात आणली. अवघ्या दीड महिन्यातच तब्बल 35 कोटीच्या ठेवी संस्थेत ठेवून पुन्हा एकदा विश्वासाहार्तता जपली आहे. ग्राहकानी दिलेला प्रतिसाद हा अनन्य असून त्या विश्वासाला पात्र राहून भविष्यात संस्थेची प्रगती करण्याचे काम केले जाईल. असे अभिवचन संस्थापक अध्यक्ष व आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिले.
प्रारंभी उपस्थित्यांचे स्वागत सचिव तुकाराम हुंदरे यांनी केले. व संस्थेच्या प्रगतीचा पाढा वाचून दाखविला. संस्थेने गेल्या 30 वर्षात केवळ भांडवल वाढीचा विचार न करता अनेक शाखा तथा विविध उद्देशीय संस्थांची रचना केली. आज या संस्थेचा महामेरू म्हणून भक्कमपणे काम पाहणारे संस्थापक व तालुक्याचे आमदार हे सर्वांचे प्रेरणास्थान ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक नारायण हलगेकर यांनी सुरुवातीच्या काळात म्हणजे 1988 मध्ये दोन रुपयाचा फंड सुरू करून युवकांची कशी फळी निर्माण करण्यात आली त्याची माहिती दिली व त्यानंतर 1995 ला या युवकांनी एक मल्टीपर्पज संस्थेची सुरुवात करताना आर्थिक उलाढालीत आलेले प्रसंग सांगितले. ज्येष्ठ संचालक चांगाप्पा निलजकर यांनी आमदार विठ्ठल हलग्या कर यांच्या खंबीर नेतृत्वाने घेतलेले अनेक निर्णय कसे प्रगतीपथावर येत गेले त्याला सभासदासह संचालकांची कशी साथ मिळाली याची माहिती दिली. ज्येष्ठ संचालक व महालक्ष्मी ग्रुपचे सचिव महादेव बांदिवडेकर म्हणाले, एखादी संस्था स्थापन करताना अनेक अडचणी येतात पण ह्या अडचणीवर मात करताना गावातील युवकांना एकत्रित करून विश्वास संपादन करणे त्यावेळी पराकष्ठेचे होते. विठ्ठल हलगेकर सारख्या युवकाने घेतलेले काही धाडसी निर्णय त्यावेळी कठीण वाटत गेले तरी हळुवारपणे त्या यशस्वी होण्यासाठी वाट मोकळे होत आज आपल्या संस्थेने एक गरुड झेप साधली असल्याचे सांगितले.
17 ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा! अहवाल मुखपृष्ठावर “ऑपरेशन सिंदूर “!

श्री महालक्ष्मी मल्टी पर्पज को- ऑप सोसायटीची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या 17 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी दहा वाजता शांतिनिकेतन पब्लिक शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. वार्षिक सभेचा अहवाल चे प्रकाशन आज आमदार विठ्ठल हलगेकर तसेच संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आले. यावर्षीचा अहवाल ऑपरेशन सिंदूर या भारतीय सेनेच्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या शौर्याला अर्पित करून अहवालाच्या मुखपृष्ठावर ऑपरेशन सिंदूर ची झलक दिली आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांनी संस्थेच्या गरुडझेप बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल करंबळकर, ज्येष्ठ संचालक यल्लाप्पा तिरविर, परसराम खांबले, पुंडलिक गुरव,बाळगौडा पाटील, महादेव गुरव,नागेश जोगोजी,देवेंद्र हुडेड, संचालिका रेणुका कोलकार, मीनाक्षी बांधीवडेकर, राजश्री हलगेकर,पार्वती शहापूरकर यासह सल्लागार संचालक राजाराम हलगेकर शंकर शहापूरकर, प्रसन्नकुमार कोलकार, शंकर उंदरे, गुंडू पांखरे, अरुण काकतकर,जयराम गुरव, ज्योतिबा सुतार, मनोहर पाटील राजू बाळांनावर, तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष कासिम हटीहोळी, सचिव प्रसन्न कुलकर्णी यासह कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
