Screenshot_20240726_084531

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीची मंदिरातील दानपेटी गुरुवारी खोलण्यात आली. या पेटीत भक्तांनी अवघ्या ६० दिवसात १ कोटी ९६ लाखांहून अधिक रक्कमेचे दान रेणुकाचरणी अर्पण केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली मोजणी गुरुवारी पूर्ण झाली. दानपेटीतील दानाची इन कॅमेरा मोजणी करण्यात आली.

यासाठी यल्लम्मा मंदिराचे शासनाधिकारी, ‘ जिल्हाधिकारी व देवस्थानचे कार्यनिर्वाहक अधिकारी एसबीपी महेश यांनी रितसर अनुमती घेऊन दानपेटी खोलण्यात आली. या दानपेटीतील रक्कम आणि मौल्यवान दागिने मोजण्यात आले. दानपेटीत १ कोटी ७१ लाख रुपये रोख रक्कम, २० लाख ४४ 1 हजार रुपये किमतीचे सोने, ४ लाख व ४४ हजार रुपये किमतीची चांदी न आढळून आली. गेल्या १ एप्रिल ते ३१ मे या ६० दिवसांत भाविकांनी हुंडीत दान केलेली रक्कम, सोनें- ● चांदी मोजण्याचे काम गुरुवारी पूर्ण झाले.

  • ही रक्कम मंदिराच्या विकासाच्या पायाभूत सुविधांसाठी वापरण्यात – येणार आहे. देवस्थान व्यवस्थापन समिती अध्यक्ष बसय्या हिरेमठ, सदस्य वाय. वाय. काळप्पनावर, अभियंता ए. बी. मुळ्ळूर, सहाय्यक आयुक्त बसवराज जिरग्याळ, न अधीक्षक नागरत्ना चोळण, कॅनरा न बँक कर्मचारी व देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us